News34 chandrapur (गुरू गुरनुले)
मुल - मुल पंचायत समिती वॉर्ड नंबर १४ मधील पंचायत समितीच्या मागील परिसरात मागील चार दिवसांपासून एक गोमातेच्या प्रसूती दरम्यान कालवड मरण पावली, सदर कालवडीचे फक्त पाय बाहेर निघाले होते. पण नंतर ती कालवड आतल्या आत गुदमरून मरण पावली, कालवड आत मरण पावली त्यामुळे गोमातेच्या शरीरात विष पसरत गोमाता मरणासन्न अवस्थेत सुन्न झाली होती. Help cow
ही बाब सामाजिक कार्यकर्ते राकेश ठाकरे, अनिल मोझेस, संतोष वाढई, सुरेश कावळे यांना माहिती होताच त्यांनी याच वॉर्ड परिसरातच राहत असलेले पशुवैद्यकीय डॉक्टर विनायक बेलसरे यांनी नगर परिषद ला पाचारण केले.
स्थानिक मुल मधील याच परिसरात लहानाचे मोठे झालेले डॉ विनायक बेलसरे यांनी आपल्या सामाजीक जाणिवेची प्रचिती देत अतिशय तांत्रिक शिताफीने मृत कालवडीला बाहेर काढत सामाजिक कार्यकर्ते व नगर परिषदेचे वसुंधरा ग्रुपचे कर्मचारी यांच्या मदतीने गोमातेचे प्राण वाचवले. नप कर्मचारी अमन सोने, अमित क्षेन्द्रे, करणं सांडे, रवी सांडे, सूर्यकांत अडेट्टीवार,निलेश देवगडे, सुरेश बावणे,रोहित नीमगडे, रोहित दहिवले, तिलक दहिवले, प्रफ्फुल तुंगीडवार यांनी विशेष प्रयत्न केले. गोमातेचे प्राण वाचून जीवनदान देणाऱ्या सामाजीक कार्यकर्ते राकेश ठाकरे, अनिल मोझेस तसेच डॉ विनायक बेलसरे यांना वार्डातील नागरिकांनी धन्यवाद देत त्यांच्याप्रती गोमाता भक्तांनी आभारही मानले आहे.
