News34 chandrapur (गुरू गुरनुले)
मूल : औद्योगीक वापराकरीता असलेली जागा व्यवसाया करीता वापरता येत नाही, असे निर्देश असतांना राज्य उत्पादन शुल्क विभागाने औद्योगीक वापराच्या जागेवर टोपाझ बार अँण्ड रेस्टारंटला परवानगी कोणत्या आधारावर दिली. असा प्रश्न माजी नगराध्यक्ष अरविंद बोकारे यांनी केला असुन सदर प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली आहे.
नागपूर महा मार्गालगतच्या सर्व्हे नंबर ३६०/२ मधील ०.८१ आर जागा तत्कालीन जिल्हाधिकारी एन. आरमुगम यांनी काही अटींवर औद्योगीक वापराकरीता मंजुर केली असून सदर जागा औद्योगीक प्रयोजना व्यतीरिक्त अन्य दुस-या प्रयोजना करीता वापरता येणार नाही, असे १० जानेवारी १९९७ च्या आदेशात नमुद आहे. Violating liquor bar
त्यामूळे सदर जागेच्या एकुण जागेपैकी काही जागेवर औद्योगीक प्रयोजनात समाविष्ठ होणारी जगदंबा राईस मिल सध्यास्थितीत सुरू आहे. सदर राईस मिलला लागुनच मागील काही महिण्यांपासून राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या परवानगीने टोपाझ बार अँण्ड रेस्टारंट राजरोसपने सुरू आहे. औद्योगीक प्रयोजनात समाविष्ठ न होणारे बार अँण्ड रेस्टारंट नियमानुसार व्यावसायीक प्रयोजनात समाविष्ठ होते. त्यामूळे जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये औद्योगीक वापराची जागा व्यावसायीक वापराकरीता देणे जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन करणारी असल्याचे मत माजी नगराध्यक्ष अरविंद बोकारे यांनी व्यक्त केले. सदर जागेवर बार अँण्ड रेस्टारंट सुरू करण्यापूर्वी खांडरे यांनी सर्व्हे नंबर ३६०/२ मधील ०.८१ आर जागेपैकी ३३२.५० चौ.मिटर जागा मनोज चंद्रकांत खांडरे यांचे नांवाने खरेदी केल्याचा स्पष्ट पुरावा म्हणून सात-बारा सादर केला. ही वास्तविकता असली तरी सदर जागा मनोज चंद्रकांत खांडरे यांनी खरेदी केली. यासंबंधी सात-बारा किंवा अन्य कोणत्याही शासकिय दस्तऐवजांवर नोंद नाही, त्यामूळे दारूबंदी उत्पादन शुल्क अधिकारी यांचेकडे सादर केलेल्या सात बारावर मनोज खांडरे यांच्या नांवाचा उल्लेख कसा आणि कोणत्या आधारावर झाला. याबाबत कोठेही उल्लेख नाही. त्यामूळे सदर जमीनीची खरेदी-विक्रीची चौकशी महसुल विभागाने केली पाहिजे, अशी अपेक्षा अरविंद बोकारे यांनी व्यक्त केली. बांधकाम विभागाच्या नियमानुसार राज्य महामार्गाच्या मध्य रेषेपासून ४० मिटर आणि आंतरराज्यीय महामार्गाच्या मध्य रेषेपासून ५० मिटर अंतर सोडून बांधकाम करणे बंधनकारक आहे. असे असतांना बांधकाम विभागाच्या नियमांचे पालन न करता सदर ठिकाणी बार अँण्ड रेस्टारंट इमारतीचे बांधकाम करण्यांत आले. जागा वापराच्या अटी शिवाय बांधकाम विभागाच्या नियमांचे उल्लंघन करून बांधण्यात आलेल्या सदर इमारतीमध्यें बार अँण्ड रेस्टारंट सुरू करण्यास दारूबंदी उत्पादन शुल्क विभागाने कोणत्या आधारावर आणि कोणाच्या शिफारसीने परवानगी दिली. हा संशोधनाचा विषय आहे. याबाबत माहिती अधिकार कायदयान्वये सामान्य नागरीक म्हणून राज्य उत्पादन शुल्क उपायुक्त यांचेकडे दाद मागीतली आहे.
ज्या जागेवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने नियमांचे उल्लंघन करून टोपाझ बार अँण्ड रेस्टारंटला परवानगी दिली तो सर्व्हे नं. ३६० पुर्णता वादग्रस्त आहे. त्याबाबत न्यायालयात वेगळे प्रकरण सुरू आहे. असे असतांना सदर जागेपैकी औद्योगीक वापराची ०.८१ आर. जागा व्यावसायीक वापराकरीता कोणत्या आधारे दिली. याबाबत संबंधीत विभागाने चौकशी न केल्यास न्यायालयात दाद मागणार.
अरविंद बोकारे
माजी नगराध्यक्ष
