News34 chandrapur
माजरी - भद्रावती तालुक्यातील माजरी येथे बाप-लेकीच्या नात्याला काळिमा फासणारी संतापजनक घटना उघडकीस आली आहे. Pocso act
40 वर्षीय बापाने स्वतःच्या 12 वर्षीय मुलीवर बलात्कार केला. मंगळवारी मुलीची आई कामानिमित्त बाहेर गेली असता नराधम बापाने सदर कृत्य केले. An outrageous act
घटनेनंतर अल्पवयीन मुलीने घडलेला प्रकार आई व मामा ला सांगितला, सदर कृत्याबाबत ऐकल्यावर आई व मामाच्या पायाखाली वाळू सरकली होती.
मुलीच्या मामाने भाची ला सोबत घेत माजरी पोलीस स्टेशन गाठत तक्रार नोंदविली. Crime news
मुलीची वैद्यकीय चाचणी केल्यावर लैंगिक अत्याचाराची पुष्टी होताच माजरी पोलिसांनी आरोपी वडीलाला अटक केली.
पोलिसांनी आरोपीवर 376 (2) (फ), 323, 506, 354, 354a, सहकलम 4, 6, 12 बाल लैंगिक अत्याचार अंतर्गत गुन्हा दाखल केला.
सदर घटनेचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी आयुष नोपाणी यांच्या मार्गदर्शनाखाली माजरी पोलीस निरीक्षक विनीत घागे, सपोनि मेघा गोखरे करीत आहे.