News34 chandrapur
चंद्रपूर - चंद्रपूर शहराच्या इतिहासात पहिल्यांदाच एका उच्च अधिकारी यांनी एखाद्या नागरिकाची फसवणूक केल्याची घटना घडलेली आहे. लातूर जिल्ह्यातील लक्ष्मण राजेंद्र पवार या इसमांकडून चंद्रपूर महानगरपालिकेचे विद्यमान आयुक्त राजेश मोहिते यांनी वर्ष 2016 मध्ये मंत्रालयामध्ये असताना आश्रम शाळेला मान्यता मिळवून देतो म्हणून 14 लाख 70 हजार घेऊन काम न करून देता फसवणूक केल्याची कबुली लक्ष्मण राजेंद्र पवार यानी केलेली होती. Fasting to death
त्या संदर्भात त्याने आयुक्त राजेश मोहिते यांना पैसे परत मिळवण्याकरिता तगादा लावला होता. परंतु वारंवार विनंती करून सुद्धा आपले पैसे परत न मिळाल्याच्या नैराशातून लक्ष्मण पवार यांनी
आयुक्त राजेश मोहिते यांच्या दालनात स्वतःवर हल्ला करून घेतला. यानंतर या प्रकरणाला चर्चेचे स्वरूप मिळाल्यानंतर लक्ष्मण राजेंद्र पवार यांच्यावरती कायदेशीर कारवाई झाली. Commisionar chandrapur municipal corporation
मात्र मनपाचे आयुक्त राजेश मोहिते यांनी आजपर्यंत यावरती कोणतेही भाष्य केलेली नाही. संपूर्ण प्रकरण हे भ्रष्टाचाराचे असून त्यांच्यावर लावण्यात आलेले आरोप हे गंभीर आहेत यावरती राजेश मोहिते यांनी आपली बाजू मांडणे योग्य असताना ते यातून स्वतः चा बचाव करताना दिसत आहेत. एका महिन्यानंतर राजेश मोहिते यांची निवृत्ती असून ते सध्या अनंतकालीन रजेवर गेलेले आहेत. Financial fraud
आपल्याला न्याय मिळावा म्हणून लक्ष्मण पवार हे जिल्हाधिकारी कार्यालय समोर आमरण उपोषणाला बसले आहेत. त्यांच्या उपोषणाचा आजचा दुसरा दिवस असून त्यांच्या या मागणीला आम आदमी पार्टी चे शहर सचिव राजू कुडे यांच्या नेतृत्वात समर्थन देण्यात आले आहे. या लढाईमध्ये आप पार्टी लक्ष्मण पवार यांच्या सोबत असून प्रशासनाने लवकरात लवकर त्यांच्या मागण्या पूर्ण कराव्या अन्यथा आप तर्फे आंदोलन करण्यात येईल. यावेळेस आप चे झोन संयोजक रहमान खान, अजय बाथव, अनुप तेलतुंबडे, कृष्णा सहारे, जयदेव देवगडे, शुभम मोगरे, भीमराज बागेसर, चंदु माडूरवार, कालिदास ओरके, राजवर्धन बोदेले, जयंत थुल, बाबाराव खडसे इत्यादी कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.