News34 chandrapur
चंद्रपूर - पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी गेल्या 8 वर्षात लोकहिताच्या विविध योजना राबविल्या. यात गरीब कल्याणाच्या योजनांवर त्यांनी विशेष भर दिला आहे. तळागाळातील सामान्य माणसाच्या चेह-यावर आनंद फुलावा, शेतकरी समृध्द व्हावा यासाठी मोदीजींनी अनेक निर्णय देखील घेतले. चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा क्षेत्रात येत्या लोकसभा निवडणूकीत भाजपाचा विजयी झेंडा पुन्हा एकदा फडकेल, असा विश्वास भारत सरकारचे पेट्रोलियम मंत्री हरदीपसिंह पुरी यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला. Chandrapur Lok Sabha Constituency
3 दिवस चंद्रपूर लोकसभा उमेदवाराबाबत पुरी हे चाचपणी करीत त्याचा अहवाल पक्षाच्या वरीष्ठपर्यंत पोहचविणार आहे.
मागील 20 वर्षे चंद्रपूर लोकसभेचे प्रतिनिधित्व हंसराज अहिर यांनी केले होते, त्यांच्या कार्यकाळात अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले होते, मागील निवडणुकीत कांग्रेसचे बाळू धानोरकर यांनी अहिर यांचा पराभव तब्बल 42 हजार मतांनी केला होता.
विशेष म्हणजे राज्यात भाजपने फक्त चंद्रपूर लोकसभेची जागा गमावली अन्यथा कांग्रेस राज्यात शून्य असती.
आता ही जागा पुन्हा भाजपकडे यावी यासाठी भाजपतर्फे तयारी सुरू करण्यात आली आहे.
हे आहेत चंद्रपूर लोकसभेचे संभावित उमेदवार
भाजप पक्षात निवडणूक लढविण्याची वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे.
72 व्या वर्षापर्यंत लोकसभा निवडणूक लढता येते, संभाव्य उमेदवारांबाबत माहिती काढली असता सध्या सुधीर मुनगंटीवार यांचं नाव आघाडीवर आहे, मुनगंटीवार सध्या राज्याचे वनमंत्री आहे, तळागाळात त्यांचं नाव आज सर्वाना परिचित आहे. त्यांनी 2014 मध्ये दारूबंदीचा निर्णय घेतल्याने मुनगंटीवार यांचे अनेक विरोधक तयार झाले होते, त्याचा काही फटका विधानसभा निवडणुकीत दिसला.
दुसरे संभावित उमेदवार म्हणजे भाजप ग्रामीण जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांचं नाव ही चर्चेत आहे, OBC म्हणून त्यांचा नावाचा विचार कांग्रेसच्या ओबीसी उमेदवार यांच्या विरोधात भाजप करू शकते.
मात्र जसा सम्पर्क त्यांचा हवा तसा सध्या लोकसभा क्षेत्रात नाही.
तिसरे संभाव्य उमेदवार म्हणून माजी खासदार हंसराज अहिर यांचही नाव आघाडीवर आहे.
मागच्या निवडणुकीत त्यांना पराभवाचा धक्का बसला मात्र ते पुन्हा कांग्रेसच्या उमेदवाराला आव्हान देण्यासाठी सज्ज झाले आहे, लोकसभा निवडणुकीत भैया चं भाऊ ला टक्कर देऊ शकतात अशी चर्चाही सुरू झाली आहे.
भाजप पक्ष वेळेवर काय आणि कुणाच्या नावावर शिक्कामोर्तब करणार ही तर येणारी वेळ सांगणार, पण सध्यातरी भाजप पक्ष संघटनात्मक बांधणी वर अधिक भर देत आहे.