News 34 chandrapur
गडचांदूर - त्या अल्पवयीन मुलीचा वडील दारूच्या नशेत आईला मारहाण करीत होता हे दृश्य बघून तिने भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला मात्र त्या वडीलाने पत्नीवर केबल कापणारा कटर उगारला मात्र तो cutter भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या मुलीच्या गळ्यावर लागला. Chandrapur crime31 ऑगस्टला सायंकाळी 7 वाजताच्या सुमारास विद्यानगर येथे राहणारे 44 वर्षीय गुलाबराव लक्ष्मण कानझोडे हे दारू च्या नशेत पत्नीसोबत भांडण करू लागले. Domestic violence
हा सर्व प्रकार गुलाबराव यांची 16 वर्षीय मुलीच्या डोळ्यासमोर घडत होता, आपल्या आईसोबत बाप दारू पिऊन भांडत आहे हे बघून त्या मुलीने दोघांचे भांडण सोडविण्याचा प्रयत्न केला मात्र अचानक गुलाब ने केबल कापण्याच्या कटर ने पत्नीवर वार करण्याचा प्रयत्न केला असता तो कटर सरळ मुलीच्या गळ्यावर लागला.
मुलीच्या गळ्यावर कटर लागताच ती खाली कोसळली रक्तबंबाळ अवस्थेत तिला रुग्णालयात नेण्यात आले. Chandrapur police
या घटनेची तक्रार गडचांदूर पोलिसांना माहिती मिळताच आरोपी गुलाबराव कानझोडे ला अटक करून ताब्यात घेतले.
मुलीला चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले असून सध्या मुलीची प्रकृती स्थिर आहे.
पोलिसांनी आरोपी गुलाब वर कलम 307 अंतर्गत गुन्हा दाखल करीत तपास सुरू केला आहे.