News 34 chandrapur
माजरी - यवतमाळ येथील पोलीस कर्मचाऱ्याचा मुलगा 26 वर्षीय तेजस्वी विजय मोगरे याने 30 ऑगस्टच्या रात्री चंद्रपुरातील माजरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पुलावर गळफास घेत आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली. Youth commits suicide
वर्धा नदीवरील पाटाळा पुलावर सकाळी नागरिकांना युवकाचा लटकलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याने त्यांनी याबाबत माजरी पोलिसांना सूचना दिली.
माजरी पोलिसांनी घटनास्थळ गाठत मृतदेहाचा पंचनामा केला.
तेजस्वी हा यवतमाळ येथे राहत असून तो MA मध्ये शिक्षण घेत होता 2 दिवसांपूर्वी निकाल ही घोषित झाला त्यामध्ये तेजस्वी चांगल्या गुणाने पास सुद्धा झाला होता. मात्र 30 ऑगस्टला तो माजरी येथील पाटाळा पुलावर येत belt ने पुलावरील लोखंडी पाईपला गळफास घेत स्वतःच आयुष्य संपविले.
तेजस्वी वणी येथे राहणाऱ्या काका अजय मोगरे यांच्या घरी गणपती पूजेसाठी आला होता, तेजस्वी ने असे टोकाचे पाऊल का उचलले याबाबत अजूनही काही स्पष्ट झाले नाही.
पुढील तपास माजरी पोलीस करीत आहे.