News 34 chandrapur
चंद्रपूर - चंद्रपूर जिल्ह्यात एकीकडे गणेशोत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरा करण्याची तयारी सुरू असताना शहरात एक इसम तलवारी हातात घेत दहशत माजवीत होता. Ganeshotsav 2022स्थानिक गुन्हे शाखेच्या सतर्कतेने त्या इसमाला ताब्यात घेत त्याचेंजवळून तलवारी व खंजर जप्त करण्यात आल्या. Lcb chandrapur
31 ऑगस्टला स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक यांना गोपनीय माहिती मिळाली की महाकाली कॉलरी परिसरात एक युवक हातात तलवार घेऊन नागरिकांमध्ये दहशत निर्माण करीत आहे. Terror with a sword
माहितीच्या आधारे खाडे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि संदीप कापडे यांच्या नेतृत्वात पोलीस कर्मचाऱ्यांना पाठविले असता पोलिसांनी त्याला मोठ्या शिताफीने अटक केली व त्याची विचारपूस केली असता त्याने आपलं नाव व्यंकटेश उर्फ व्यंक्या कोपेलवार रा. आनंदनगर महाकाली वार्ड असे सांगितले. Sword
गुन्हे शाखेने धारदार तलवार ताब्यात घेत त्याच्या घराची झडती घेतली असता 3 तलवारी व खन्जर मिळून आल्या, आरोपी व्यंकटेश ने सांगितले की सदर तलवार त्याच्या मित्रांनी दिल्या आहे.
व्यंकटेश च्या दोन्ही मित्रांचा शोध घेतला असता ते मिळून आले नाही. Arms act crime
आरोपीविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायदा अनव्ये गुन्हा दाखल करण्यात आला.
सदरची यशस्वी कारवाई जिल्हा पोलीस अधिक्षक अरविंद साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्या नेतृत्वात सपोनि संदीप कापडे, पोउपनी अतुल कावळे, संजय आतकुलवार, नितीन रायपूरे व रवींद्र पंधरे यांनी केली.
पुढील तपास शहर पोलीस करीत आहे.