News34 chandrapur (गुरू गुरनुले)
मुल - मुल तालुक्यातील मौजा गांगलवाडी येथील गरीब शेतमजूर मुकुंदा कीचक आपल्या कौलारू मातीच्या घरात कुटुंबासह राहत होते. House collapsed मागील तीन दिवसापासून सतत मुसळधार पाऊस आल्याने आणि अजूनही रिमझिम पाऊस सुरू असल्याने सोमवारी रात्री १२ वाजता अचानक राहते घर कोसळले.Heavy rainfall
कुटुंब त्वरित घराबाहेर निघाले परंतु घराच्या सर्व भिंती आणि कवेलू फाटे याचा पूर्ण चुराडा झाला घरातील सामानाचे नासधूस झाले असल्याने आर्थिक नुकसानही झाले आहे. मुकुंदा व त्याचे कुटुंब बेघर झाले आहे. Rain alert
याबाबत महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली असल्याचे गावातील उपसरपंच श्री केवे यांनी सांगितले करीता घर पडून बेघर झालेल्या कीचक कुटुंबियांना कुठेतरी राहण्यासाठी व्यवस्था करावी तसेच शासनाकडून घर बांधण्यासाठी आर्थिक मदत करावी अशी मागणी उपसरपंच श्री केवे यांनी केली आहे.
