News34 chandrapur
चंद्रपूर - चंद्रपुरातील दाताला येथे आज 2 मित्रांच्या मृत्यूच्या घटनेने दाताला गावात शोककळा पसरली.
दाताला जुन्या वस्तीकडे इरई नदीच्या पात्रजवळ पोहण्याची मज्जा लुटण्यासाठी दुपारच्या सुमारास 16 वर्षीय गौरव वांढरे व 17 वर्षीय रोहन बोबाटे आपल्या मित्रांसह गेले होते. Sad news
पोहण्याची मज्जा घेतल्यावर मित्र घरी पोहचले मात्र गौरव व रोहन परत न आल्याने काही मित्र व गावकऱ्यांनी नदीजवळ धाव घेतली.
दोघांचा काही पत्ता लागला नाही, नदी किनारी दोघांचे कपडे होते, गावकऱ्यांनी दोघांचा शोध घेतला असता गौरव चा मृतदेह मिळाला, गौरव चा मृतदेह बघून कुटुंब व मित्र सदस्यांनी हंबरडा फोडला. घटनेची माहिती मिळताच रामनगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
पोलिसांनी रोहन चा शोध घेण्यासाठी तात्काळ रेस्क्यू टीम ला पाचारण केले, रोहन चा शोध सुरू झाला काही वेळातच रोहनचा ही मृतदेह नदीत मिळाला.
रोहन व गौरव हे दोघेही जवळचे मित्र होते, दोघेही दाताला येथे राहत असून दहावी वर्गात शिकत होते, दोघे जिल्हा स्टेडियम समोरील लोकमान्य टिळक शाळेचे विद्यार्थी होते.
अचानक घडलेल्या या घटनेमुळे दाताला गावातील वांढरे व बोबटे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.