News34 chandrapur
चंद्रपूर - चंद्रपुरातील दाताला येथे आज 2 मित्रांच्या मृत्यूच्या घटनेने एकच खळबळ उडाली.
दाताला जुन्या वस्तीकडे इरई नदीच्या पात्रजवळ पोहण्याची मज्जा लुटण्यासाठी दुपारच्या सुमारास 16 वर्षीय गौरव वांढरे व 17 वर्षीय रोहन बोबाटे आपल्या मित्रांसह गेले होते.
पोहण्याची मज्जा घेतल्यावर मित्र घरी पोहचले मात्र गौरव व रोहन परत न आल्याने काही मित्र व गावकऱ्यांनी नदीजवळ धाव घेतली.
दोघांचा काही पत्ता लागला नाही, नदी किनारी दोघांचे कपडे होते, गावकऱ्यांनी दोघांचा शोध घेतला असता गौरव चा मृतदेह मिळाला, गौरव चा मृतदेह बघून कुटुंब व मित्र सदस्यांनी हंबरडा फोडला.
रामनगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून रेस्क्यू टीम रोहन चा शोध घेत आहे. Breaking news
रोहन व गौरव हे दोघेही जवळचे मित्र होते, दोघेही दाताला येथे राहत असून दहावी वर्गात शिकत होते, दोघे जिल्हा स्टेडियम समोरील लोकमान्य टिळक शाळेचे विद्यार्थी होते. 2 friends drowned
अचानक घडलेल्या या घटनेमुळे दाताला गावात दुःखाचे वातावरण पसरले आहे.