News34 chandrapur
सावली - राज्यात वर्ष 2012 पासून पूर्णतः सुगंधित तंबाखू व गुरख्यावर प्रतिबंध करण्यात आला होता, त्यानंतरही राज्यात खुलेआम सुगंधित तंबाखूची विक्री होत आहे, अनेक जिल्ह्यात तोंडाचा कॅन्सर सपाट्याने वाढत आहे, मात्र प्रशासन ही अवैध विक्री थांबवू शकली नाही. Crime news
चंद्रपूर जिल्ह्यात mouth cancer चे प्रमाण झपाट्याने वाढले आहे, या जीवघेण्या कॅन्सरने अनेकांचा जीव घेतला मात्र अन्न व औषध प्रशासन विभाग आजही कुंभकर्णी झोपेत आहे.
प्रतिबंधित सुगंधित तंबाखू ची तस्करी आता ट्रॅव्हल्स द्वारे होत आहे. Ban tambakhu
अवैध प्रतिबंधित तंबाखू व गुटख्याची वाहतूक होत असल्याच्या माहितीच्या आधारावर सावली पोलिसांनी नाकाबंदी करून अवैध प्रतिबंधित तंबाखू व गुटखा गुरुवारी सायंकाळी जप्त केला. याप्रकरणी पोलिसांनी चालक तरकेश्र्वर साहू (43) रा. भेंडीकला जिल्हा राजनांदगाव छ. ग. 2, वाहक बिर किशोर सूनानी (33) रा. रायपूर छ. ग, तुमेश कुमार साहू (28) रा. सुख्री जिल्हा रायपूर छ. ग. यांच्यावर कलम 188, 272, 273 भादवी सह कलम 59 अन्न सुरक्षा मानके अधिनियम अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला. या कारवाईत पोलिसांनी 32 हजार 266 हजार रुपयांचा सुगंधित तंबाखू पानमसाला व ट्रॅव्हल्स असा एकूण 15 लाख 32 हजार 266 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. Banned scented tobacco
शासनाने सुगंधित तंबाखू गुटखा पानमसाल्यावर बंदी घातली आहे. तरीसुद्धा अनेकजण सुगंधित तंबाखूची तस्करी करून विक्री करत आहेत. ट्रॅव्हल्समधून सुगंधी तंबाखूची वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती सावली पोलिस स्टेशनचे ठाणेदार आशिष बोरकर यांना मिळाली. त्यांनी आपल्या पथकासह गडचिरोली चंद्रपूर रोडवर नाकाबंदी केली. रायपूर ते चंद्रपूर जाणाऱ्या ट्रॅव्हल्स क्रं सीजी 19 एफ 0833 ला थांबवून तपासणी केली. यावेळी ट्रॅव्हल्सच्या डिकीत
राजश्री पान मसाला, विमल पानमसाला (vimal pan masala), इगल सुगंधित तंबाखू आढळून आला. पोलिसांनी सुगंधित तंबाखू व ट्रॅव्हल्स असा एकूण 15 लाख 32 हजार 266 रूपयांचा मुद्देमाल जप्त करून तिघांवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. Vimal gutkha
सदरची कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी मल्लिकार्जुन इंगळे, ठाणेदार आशिष बोरकर यांच्या मार्गदर्शनाखाली स.फौ दादाजी बोलिवार, पोहेका दर्शन लाटकर, नापोका विशाल दुर्योधन आदींनी केली.
Banned scented tobacco worth Rs. 32,266 seized from private bus in Saoli
Saoli , 16 September - The Saoli police has seized banned gutka and tobacco worth Rs. 32,266 from a private travel bus and arrested 3 persons on Thursday evening.
Based on tip-off , the Saoli police had set-up barriers on Gadchiroli-Chandrapur highway and stopped the private travel bus no. CG 19F 0833 of Mahendra Travels which was coming from Raipur and going to Chandrapur. In their checking of a bus , the police had found banned scented gutka and tobacco like Rajshri Pan Masala , Vimal Pan Masala and Eagle tobacco worth Rs. 32,266.
Three person are arrested in this regard. The accused are identified as Tarkeshwar Sahu (42) , resident of Bhendikheda of Rajnandgaon district , Bir Kishor Sunani (33) , resident of Raipur and Tumesh Kumar Sahu (28), resident of Sukhi of Raipur district. All three accused are from Chhatisgarh state. The sale and consumption of scented gutka and flavoured tobacco has been banned in Maharashtra since 2013. It is people's talk that banned scented tobacco is used to being smuggled from Chhattisgarh to Maharashtra. The private travel buses are the main sources of this smuggling. The Saoli police has registered a case against all the accused under IPC sections 188 , 272 and 273 as well as section 59 of Food and Drug Act. Police have also seized a travel bus worth Rs. 15 lakhs. This police action was carried out under the guidance of SDPO Mallikarjun Ingle by Station In charge Ashish Borkar , PSI Chichghare , constables Boliwar , Latkar and Vishal Duryodhan.
