News34 chandrapur
चंद्रपूर - जिवती तालुक्यातील वनक्षेत्रात समाविष्ट शेतजमिनी व गावांचा महसुली क्षेत्रात पुर्ववत समावेश करण्यासाठी व्यक्तिशः हस्तक्षेप करावा.
गवळी समाजाच्या सर्व पोटजातींना केंद्राच्या ओबीसी सूची मध्ये समावेश व्हावा तसेच राजुरा तालुक्यातील लक्कडकोट येथील राजुलगोंदी तलावाच्या निर्मितीकरिता तत्कालीन राज्यपाल महोदयांनी दिलेल्या आश्वासनानुसार या तलावाच्या निर्मितीकरीता आपल्यास्तरावरून शासनास निर्देश द्यावे आदि मागण्यांना घेऊन पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री तथा भाजपा ओबीसी मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष हंसराज अहीर यांनी दि १५ सप्टेंबर रोजी राज्यपाल भगत सिह कोश्यारी यांची शिष्टमंडळासह भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. Governor of maharashtra bhagat singh koshyari
यावेळी राज्यपाल महोदयांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला. या भेटीप्रसंगी राज्यपालांना जिवती येथे भेट देण्याकरिता निमंत्रण दिले. शिष्टमंडळात जिवती प.स. चे माजी उपसभापती महेश देवकाते, गवळी समाजाचे प्रदेश अध्यक्ष हिरामण अप्पा गवळी, कार्याध्यक्ष इंजि. अशोक भाले, सदाशिव खडके, अभिमन डोईजड सहभागी होते. Hansraj ahir bjp

