News34 chandrapur (गुरू गुरनुले)
मुल - मागील अनेक महिन्यांपासून कायम स्वरुपी मुख्याधिकारी नसल्याने नगरातील अनेक समस्या प्रलंबित आहेत. अनेक नागरिकांचे कामे तीन चार महिन्यापासून अडली आहेत. त्यामुळे कायम स्वरुपी मुख्याधिकारी यांची नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी नागरिकांतर्फे करण्यात आली होती. करीता शासनाने अजय पाटणकर यांना मुल येथे नियुक्ती केल्याने नुकतेच नगर परिषद मूलचा प्रभार स्वीकारला आहे. Shivsena news
करीता तालुका शिवसेना पदाधिकारी यांचे तर्फे मुख्याधिकारी अजय पाटणकर यांचे पुष्प गुच्छ देऊन स्वागत करण्यात आले असून मुल शहरातील प्रलंबित असलेल्या समस्यांचे निवेदन देऊन समस्या मार्गी लावावे अशी मागणी तथा विनंती सुद्धा प्रशांत गट्टूवार यांनी केली. यामध्ये अनेक भागांमध्ये-प्रभागांमध्ये शहरवासीयांना अडचणींचा सामना करावा लागणाऱ्या अनेक समस्या आहेत. शहरातील नागरीकांना मुलभुत गरजांची पुर्तता करण्याची प्रमुख जबाबदारी असणारी यंत्रणा म्हणुन नगर परिशदेची निर्मीती करण्यात आली आहे. परंतु नगर परिषदेच्या प्रदिर्घ कालावधी नंतरही शहरवासीयांना आपल्या मुलभुत गरजांच्या सोडवणुकीसाठी विनवणी करावे लागणे ही अत्यंत खेदजनक बाब असल्याचे नाईलाजाने नमुद करावे लागते. आपल्या कार्यालय अधिनस्त असलेल्या जबाबदार अधिकारी, कर्मचाऱ्यायाच्या नाकर्तेपणामुळे शहरातील नागरीकांना अडचणींच्या सामना करावा लागत आहे.

कृपया पुढील समस्यांबाबत सोडवणुकीसाठी प्रयत्न करावा.
1) पोलीसांच्या तिसरा डोळा या उद्देषाने शहरातील मुख्य मार्गांवर लावण्यात आलेले सीसीटिव्ही कॅमेरे मागील अनेक दिवसांपासुन बंद अवस्थेत असल्याने अनुचीत घटनांच्या तपास करतांना पोलीस विभागाला अडचणी येत आहे.
2) प्रभाग क्रमांक 8- 1) श्री. झुलेलाल मंदीर रस्त्याचा कडेला बनविण्यात आलेल्या भुमीगत नाल्यांवर पेवर ब्लॉक लावण्यात आलेले नाही. परीसरात घाणीचे साम्राज्य पसरले असुन आरोग्याची समस्या निर्माण झाली आहे.
2) माजी नगर सेवक श्री.महेष हरडे ते माजी जि.प. अध्यक्ष संध्याताई गुरनुले यांच्या घराकडे जाणाऱ्या रस्ता परीसरात पावसाचे तसेच घरगुती सांडपाणी वाहुन जाण्याची व्यवस्था नाही त्यामुळे यापरीसरात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. डुकरांचे वावर मोठयाप्रमाणात असल्याने साथीचे आजार वाढले आहे. याच रस्त्यावर जुना रेल्वे स्टेषन परीसरात विदयुत व्यवस्था नसल्याने अंधाराचे साम्राज्य, महीला-मुलींसाठी ये-जा करण्यास अडचणीचे असल्याने लक्ष देण्याबाबत
3) श्री. सुनील काळे यांचे घरापुढील रस्त्याच्या कडेला घाणीचे साम्राज्य असुन सांडपाणी वाहुन जाणाऱ्या नाल्यांचे चेंबर उघडे ठेवण्यात आल्याने अनेकदा अपघात घडले कृपया समस्या सोडविण्यात यावी.
2) प्रभाग क्रमांक 2- 1) जुना चितेगाव रोड लगत असलेल्या मोकळया जागेत लावण्यात आलेल्या व्यायामाच्या साहीत्यांचे मोडतोड झाले असुन परिसरात अस्वच्छता पसरलेली आहे. 2) या प्रभागात सार्वजनीक षौचालय बनविण्यात आले मात्र विदयुत व्यवस्था नगसल्याने अंधाराचे साम्राज्य व पाण्याची व्यवस्था नसल्याने सर्वत्र निव्वळ घाणचंघाण
3) माजी नगर सेवक विनोद सिडाम यांचे घराकडील रस्त्याचे खडीकरण करण्यात आले मात्र नालीची व्यवस्था नसल्याने सांडपाणी रस्त्यावर येत असुन परीसरात डासांचे प्रमाण मोठयाप्रमाणात वाढले आहे. सदरची व्यवस्था रोगराईला निमंत्रण देत आहे.
यासोबतच षहरातील काही भागांमध्ये पिण्याचे पाणी पुरेसे प्रमाणात नियीमत वितरीत होत नसल्याने नागरीकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.
महोदय, उपरोक्त विशयांच्या सोडवणुकीसाठी आपण स्वतः जातिने लक्ष देण्याची गरज असुन सदर समस्यांचे तातडीने निराकरण करावे असे लेखी निवेदन मुख्याधिकारी पाठनकर यांना शिवसेना तालुका प्रमुख प्रशांत गट्टूवार यांचे नेतृत्वात दिले असून निवेदनाची प्रत नगर प्रशासक साहेब यांनाही पुढील कार्यवाहीसाठी दिले आहे. शहर प्रमुख मनोज मोहुर्ले,समन्वयक रवी शेतकी,माजी तालुका प्रमुख सुनील काळे,माजी संघटक महेश चौधरी,युवासेना शहर प्रमुख अमित आयलानी,संदीप सिडाम,रोहित नीकुरे,आदित्य मोहरले,अशोक गंडाटे,भविन लाटेलवार, भगीरथ गेडाम,यांचेसह अन्य शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.