News34 chandrapur
वरोरा - शहरात 5 सप्टेंबर ला संघटनेच्या माजी जिल्हा उपाध्यक्षाने फार्मासिस्ट महिलेचा विनयभंग केल्याची घटना घडली होती, त्याला अटक व सुटका झाली आहे.
सदर घटनेनंतर शहरातील एका वकील असलेल्या महिलेचा विनयभंग डोंगरवार चौकातील एकाने केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली.
आरोपी संदीप चटकोजवार हा त्याच परिसरात राहत असून मागच्या वर्षी पासून संदीप हा वकील महिलेला हातवारे करीत होता. Molested
तीन महिन्या अगोदर महिला दुचाकीने घरी जात असताना संदीप ने तिला हातवारे करीत महिलेकडे एकटक बघत होता.
6 सप्टेंबर ला महिला आपल्या पतीसोबत जात असताना संदीप महिलेकडे बघून हसत होता.
वारंवार संदीप त्या महिलेकडे बघत हसत व एकटक बघत असल्याने याबाबत त्या महिलेने वरोरा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली.
पोलिसांनी संदीप वर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला मात्र संदीप पोलिसांच्या हाती आला नाही.
वरोरा शहरात विनयभंगाच्या घटनेत सतत वाढ होत असून ही चिंतेची बाब आहे.
पुढील तपास वरोरा पोलीस करीत आहे.