News34 chandrapur
चंद्रपूर : मनपा आयुक्त राजेश मोहिते यांच्याविरुद्ध मनपाच्या तत्कालीन महापौर राखी कंचर्लावार, उपमहापौर राहुल पावडे आदी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी तक्रार केल्याची बाब प्रसिद्धी माध्यमातून समोर आली. सतेत असताना भ्रष्ट अधिकाऱ्यांशी संगनमत करून करोडो रूपयांचे घोटाळे करायचे अन आता चक्क त्याच अधिकाऱ्यांच्या विरोधात तक्रार करायची म्हणजे चंद्रपूर शहरातील नागरिकांची दिशाभूल करण्याचा प्रकार असल्याची टिका माजी नगरसेवक पप्पू देशमुख यांनी प्रसिद्धीपत्रकातून केली आहे. Faking complent
शहरातील २५० कोटींची अमृत योजना पाच वर्षे लोटूनही पूर्णत्वास आली नाही. करोना काळात मनपाच्या निधीतून भाजपच्या नेत्याचे नावे डबे वाटप करून डबा घोटाळा, क्वारंटाईन सेंटरवर अव्वाच्या सव्वा दराने भोजन पुरवठ्याचे कंत्राट देऊन भोजन घोटाळा, दर महिन्याला दोन लक्ष व वर्षाला २४ लक्ष रूपयांचे प्रसिद्धीचे काम, १०० कोटी रूपयाचे कचरा संकलनाचे कंत्राट, मालमत्ता कर मुल्यांकनाचे सहा कोटी रूपयांचे काम, १९ कोटी रूपयांचे जलमापक यंत्राचे कंत्राट, लेबर पेमेंट घोटाळा, वाहन पुरवठा घोटाळा अशी चंद्रपूर महानगरपालिकेतील घोटाळ्यांची लांबलचक यादी भाजपा पदाधिकाऱ्यांच्याच काळातील आहे. या सर्व घोटाळ्यांच्या विरोधात सभागृहात वारंवार पुरावे देऊन कारवाईची मागणी केली. मात्र प्रत्येक वेळी मनपातील भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी घोटाळे झाल्याचा आरोप फेटाळून लावला. आता निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयुक्त राजेश मोहिते यांचा सभागृहात बचाव करणाऱे राखी कंचर्लावार व राहुल पावडे यांनी त्यांच्याविरुद्ध पोलिसात तक्रार करणे म्हणजे केवळ ‘नौटंकी’ आहे. मनपा भ्रष्ट अधिकाऱ्यांशी संगणमत करून भाजपच्या सत्ताधाऱ्यांनी मनपाला लुटले. त्यांना त्यांना चंद्रपूरकर कदापी माफ करणार नाही, असे माजी नगरसेवक पप्पू देशमुख यांनी प्रसिद्धिपत्रकातून म्हटले आहे.
Chandrapur bjp
भ्रष्टाचाऱ्यांना तुरुंगात जावेच लागेल
मनपातील सर्व घोटाळ्यांचे पुरावे आमच्याकडे उपलब्ध आहेत. योग्यवेळी योग्य ठिकाणी याबाबत तक्रार करून पाठपुरावा करणार आहे. चंद्रपूरकरांनी कामाच्या पैशातून दिलेल्या टॅक्सची लूट करणाऱ्या अधिकारी व पदाधिकाऱ्यांना एक दिवस नक्कीच तुरुंगात जावे लागेल.
-पप्पू देशमुख, माजी नगरसेवक तथा अध्यक्ष जनविकास सेना, चंद्रपूर
