News34 chandrapur
चंद्रपूर - राष्ट्रीय मूलनिवासी महिला संघ चे चंद्रपूर जिल्हा अधिवेशन नुकतेच लिटिल फ्लॉवर स्कूल च्या सभागृहात पार पड़ले.
सदर अधिवेशनाची अध्यक्षस्थानी सारिका भगत राष्ट्रीय मूलनिवासी महिला संघ राष्ट्रीय प्रचारक नई दिल्ली या होत्या.कार्यक्रमाचे उदघाटक म्हणून मा प्रमिला दुबे संचालिका लिटिल फ्लॉवर स्कूल या होत्या. तर प्रमुख वक़्ते म्हणून डॉ मालती भागवत ( नेत्रतज्ञ,चंद्रपुर), मुन्नी मुमताज शेख (संचालिका,माँ फातिमा बहुद्देश्यीय संस्था), मीना कांबळे (RPI (खोब्रागडे गट) चंद्रपुर, प्रिया खाड़े ( RPI आंबेडकर गट) चंद्रपुर, पौर्णिमा जुलमे ( सामाजिक कार्यकर्ता, चंद्रपुर),मा बबिता चालखुरे ( सामाजिक कार्यकर्ता), मा प्रियंका देवगडे (सामाजिक कार्यकर्ता, चंद्रपूर), प्रा सूचिता खोब्रागडे (राष्ट्रीय मूलनिवासी महिला संघ,प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र राज्य), सविता कांबळे ( नगरसेविका, मनपा,चंद्रपूर), रत्नमाला खोब्रागडे ( सेवानिवृत्त,केद्रप्रमुख चंद्रपूर), प्रा कविता बांदरे ( RMBKS उपाध्यक्ष,महाराष्ट्र राज्य), प्रियंका मडावी (आशावर्कर,चंद्रपूर), संघमित्रा सोनटक्के ( भारत मुक्ति मोर्चा महिला संघ,चंद्रपूर), डॉ ज्योत्सना भागवत ( बहुजन क्रांति मोर्चा महिला आघाडी, चंद्रपूर) या सर्व महिला कार्यकर्ता उपस्थित होत्या.
१) महिलांचे राष्ट्रीय स्तरावरील स्वतंत्र व स्वायत्त संग़ठन निर्माण करण्यात येणाऱ्या अडचणी व त्यांचे समाधान-- एक मंथन.
२)EVM च्या माध्यमातून लोकशाहीवर कब्जा करणे आणि मनुस्मृति लागू करून मूलनिवासी बहुजन समाजाला गुलामीत ढकलणे होय.-- एक गंभीर चर्चा
३)जो पर्यन्त सामाजिक संघर्षातून नेतृत्व सत्तेत जात नाही तो पर्यंत मूलनिवासी बहुजन समाजाच्या समस्या सुटनार नाही. यावर सविस्तर व सखोल मार्गदर्शन अध्यक्षा मा सारिका भगत यानी केले. महिलानी समोर येऊन राष्ट्रीय स्तरावरील महिला संग़ठन मध्ये काम करून व्यवस्था परिवर्तनाचे कार्य महिलानी करावे अशे आवाहन त्यानी केले. चंद्रपुर महिला यूनिट च्या वतीने रुपये 50 हजारची रक्कम जनआंदोलन निधी अध्यक्षा कड़े सुपुर्द करण्यात आली.
कार्यक्रमाचे संचालन मा रचना गेडाम यांनी, प्रास्ताविक प्रा सूचिता खोब्रागडे तर आभार प्रदर्शन मा.डॉ ज्योत्स्ना भागवत मॅडम यानी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजन मा संघमित्रा सोनटक्के, डॉ ज्योत्स्ना भागवत, भारती खोब्रागडे, ज्योति वाळके,शीतल भगत,रचना गेडाम, कविता बांदरे, सुषमा चिकाटे,संजीविनी मेश्राम,करुणा पडवेकर आदी ने परिश्रम घेतले.

