News34 chandrapur
चंद्रपूर - विदर्भात तब्बल 100 कोटीं रुपयांचा घोटाळा करणाऱ्या कलकाम कंपनीचा वाद आता मनसे पक्षपर्यंत गेला आहे. कलकाम मधील एजंट व गुंतवणूकदार यांनी मनसेच्या प्रतिमा ठाकूर व भरत गुप्ता हे कंपनीची बाजू घेत एजंट व गुंतवणूकदार यांना धमकवीत होते असा आरोप केला. Mns adhikrut सदर प्रकरण मनसेच्या रिटा गुप्ता नंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे पर्यंत पोहचला. कम्पणीच्या एजंट व गुंतवणूकदार रत्नमाला चहारे यांनी पत्रकार परिषदेत ठाकूर व गुप्ता हे गुंड प्रवृत्तीचे आहे असे संबोधिले होते. कलकाम एजंट चहारे व लोणारे यांनी कोणत्या आधारावर आम्हाला गुंड म्हणून संबोधिले? असा सवाल मनसे महिला शहर अध्यक्ष प्रतिमा ठाकूर यांनी उपस्थित करीत चहारे व लोणारे यांच्यावर कारवाईचा इशारा दिला. Kal kaam news आज झालेल्या पत्रकार परिषदेत प्रतिमा ठाकूर यांनी वरोरा विधानसभा जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे यांचेवर आरोप करीत राज ठाकरे समोर जो कलकाम एजंट व गुंतवणूकदार यांनी गदारोळ केला त्याच्या पडद्यामागील सूत्र कुकडे यांनी हलविले होते, याबाबत आम्ही वरिष्ठांपर्यंत तक्रार केली आहे असे ठाकूर यांनी सांगितले. आम्ही तर पीडित नागरिकांची मदत करीत होतो, आम्हीसुद्धा अनेकांचे पैसे काढून दिले आहे, मदत केल्यावर आमच्यावर असे आरोप करणे चुकीचे आहे. लोणारे व चहारे यांनी आमची माफी मागावी अन्यथा आम्ही कोर्टात जाऊ असा इशारा प्रतिमा ठाकूर यांनी दिला आहे. Chandrapur mns
काय म्हणाल्या रत्नमाला चहारे
आम्ही जेव्हा कंपनीकडे नागरिकांचे पैसे मागण्यासाठी जात होतो त्यावेळी ठाकूर व गुप्ता हे कंपनीची बाजू घेत होते, त्यांनी अनेकदा आमच्या बैठकीत गुंतवणूक यांना धमक्या दिल्या होत्या, फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांचे पैसे आम्हाला परत हवे, याआधी सुद्धा ठाकूर व गुप्ता यांनी आम्हाला वकील तर्फे नोटीस पाठविले होते, ते नोटीस आम्ही रिटा गुप्ता यांना दाखविले होते.
राहिला प्रश्न माफी मागण्याचा ते तर आम्ही मागणार नाही, आम्ही आमच्याया हक्काची लढाई लढत आहोत - रत्नमाला चहारे
यावर जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे यांची प्रतिक्रिया काय?
मनसे नेते बाळा नांदगावकर यांच्या कार्यालयात कलकाम कंपनीच्या गुंतवणूकदारांचा विषय गेला होता व त्यांच्या कार्यालयातून चंद्रपूर जिल्हा संपर्क अध्यक्ष सचिन भोयर यांच्याकडे न्याय मिळावा म्हणून कलकाम च्या गुंतवणूकदार एजंट महिलांना पाठविण्यात आले. दरम्यान सचिन भोयर हे भरत गुप्ता व प्रतिमा ठाकूर यांच्यासोबत असल्याने त्यांनी कलकाम कंपनीच्या गुंतवणूकदाराचा विषय न हाताळता वरिष्ठ मनसे पदाधिकाऱ्यांचा अपमान केला. त्यामुळे तो विषय माझ्याकडे पूर्व मनसे संपर्क अध्यक्ष नंदू घाडी यांच्याकडून माझ्याकडे आला व तो विषय मी हाताळला आणि कलकाम कंपनीच्या संचालकांविरुद्ध तक्रार केल्यानंतर त्यांच्यावर एमपीआयडी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. परंतु प्रतिमा ठाकूर व भरत गुप्ता यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांचे स्विय सहाय्यक यांच्याकडे सदर प्रकरणी कंपनी पैसे परत देण्यास तयार असल्याची माहिती दिली होती व कलकाम च्या गुंतवणूक व एजंट यांच्यात वाद त्यांनी लावला होता.
मनसे च्या नेत्यांनी माझ्याकडे विषय दिल्याने मी कलकाम चा विषय मार्गी लावण्याचा प्रयत्न केला पण भरत गुप्ता व प्रतिमा ठाकूर यांनी माझ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता पण मी माझ्या सर्व कलकाम च्या गुंतवणूकदार यांच्या पाठीशी आहे.
