News34 chandrapur
चंद्रपूर - On Duty 24 तास कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांना वर्षातून एकदा आपल्या कला गुणांना प्रदर्शित करण्याचा वेळ मिळतो. Police games
नागपूर विभागीय पोलीस स्पर्धा यंदा चंद्रपुरात झाली, या स्पर्धेत वर्धा, भंडारा, गोंदिया, नागपूर ग्रामीण, चंद्रपूर व गडचिरोलीजिल्ह्यातील एकूण 660 पोलीस स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. Nagpur area police sports
18 ते 23 सप्टेंबर पर्यंत सुरू असलेल्या पोलीस क्रीडा स्पर्धेत चंद्रपूर पोलिसांनी मैदान मारले, सलग 5 वेळा नागपूर विभागीय क्रीडा स्पर्धेचं जेतेपद पटकाविण्याचा बहुमान चंद्रपूर पोलिसांना मिळाला.
कार्यक्रमाच्या समारोपीय सोहळ्याला विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. छेरिंग दोरजे, चंद्रपूर पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, नागपूर ग्रामीण पोलीस अधीक्षक विजय मगर, वर्धा पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर, भंडारा पोलीस अधीक्षक लोहित मतानी, गडचिरोली पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांची उपस्थिती होती. Winner Chandrapur police
सदर स्पर्धेत उत्कृष्ट Athletic पुरुष गटात नाजूक मोहूर्ले, गडचिरोली, उत्कृष्ट Athletic सुनेना डोंगरे, वर्धा, यांनी मान पटकाविला.
पुरुष खेळाडूंनी 201 पॉईंट व महिला गटाने 153 पॉईंट प्राप्त करीत चंद्रपूर पोलीस क्रीडा स्पर्धेचे जेतेपद पटकाविले.
मार्गदर्शन संबोधनात विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. दोरजे यांनी पोलिसांना खेळाचे महत्व, शारीरिक जोपासना कशी करावी याबाबत मोलाचा सल्ला दिला.
आयोजित कार्यक्रम यशस्वी करणेकरिता पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक राधिका फडके, राखीव पोलीस निरीक्षक योगेश पारधी, पोलीस निरीक्षक सुमित परतेकी, संदीप एकाडे व विविध पोलीस कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम केले.
