News34 chandrapur
चंद्रपूर - मनसे पक्ष स्थापनेपासून चंद्रपूर जिल्ह्यातील मनसेचे नेतृत्व दिलीप रामेडवार यांनी केले मात्र त्यांच्या कार्यकाळात मनसेला अपेक्षेप्रमाणे यश मिळाले नाही. Mns adhikrut
नुकत्याच मनसे पक्षाच्या पक्ष बांधणीसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे स्वतः चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. Mns breaking
दौरा झाल्यावर कार्यकारणीमध्ये बदलाचे संकेत त्यांनी दिले.
चंद्रपूर मनसेला 2 नवे जिल्हाध्यक्ष मिळाले, चंद्रपूर, राजुरा व मूल विधानसभेची जबाबदारी मनदीत रोडे तर वरोरा, चिमूर व ब्रह्मपुरी विधानसभेची जबाबदारी राहुल बालमवार यांना मिळाली आहे. Mns president chandrapur
राहुल बालमवार हे अत्यंत संयमी स्वभावाचे असून ते पक्ष स्थापनेपासून मनसे पक्षात सक्रिय आहे.
शाखा अध्यक्ष ते घुघुस शहर अध्यक्ष, तालुकाध्यक्ष, जिल्हा उपाध्यक्ष, मनवीसे जिल्हाध्यक्ष, मनसे गोंदिया संपर्क प्रमुख व आता थेट मनसे जिल्हाध्यक्षाची जबाबदारी त्यांना मिळाली आहे.
त्यांच्या या संघर्षमय काळात त्यांनी पडोली, दाताला व देवाळा, नागाळा भागात ग्रामपंचायत मध्ये अनेक सदस्य निवडून आणले.
सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असणारे बालमवार यांनी अनेक विद्यार्थ्यांचे व कामगारांचे प्रश्न मार्गी लावले आहे.
येणाऱ्या काळात चंद्रपूर जिल्हा परिषदेत सदस्य निवडून आणण्याचा त्यांनी निश्चय केला आहे.
याची मोर्चेबांधणी सुद्धा बालमवार यांनी आधीपासून केलेली आहे, आता जबाबदारी मिळाल्यावर ते पक्ष संघटनेवर भर देत जिल्ह्यात मनसेला नवी उभारी देण्यासाठी प्रयत्न करणार आहे.
विशेष म्हणजे पक्षांतर्गत वाद न ठेवता मिळून काम करण्याची सक्त ताकीद मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नव्या जिल्हाध्यक्ष याना दिली आहे, माजी जीलाध्यक्ष रामेडवार यांना राज ठाकरे यांनी मनसे राज्य उपाध्यक्ष पदाची जबाबदारी दिली असून सचिन भोयर यांना चंद्रपूर महानगर अध्यक्ष पदाची धुरा सोपविली आहे.
राहुल बालमवार यांना जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी मिळाल्यावर कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचे वातावरण आहे, अनेक मित्र परिवार व मनसे सदस्यांनी बालमवार यांना पुढील राजकीय भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहे.
