News34 chandrapur
नांदेड - जिल्ह्यातील अर्धापुर तालुक्यातील चाभरा या गावी भाच्याने मामावर कुऱ्हाडीने वार करीत हत्या केली, 9 सप्टेंबर ला बालाजी काकडे हे घराबाहेर झोपले असताना अज्ञाताने काकडे यांचेवर कुऱ्हाडीने वार केला, यात ते गंभीर जखमी झाले होते डॉक्टरांनी काकडे यांना मृत घोषित केले असता पोलिसांनी याबाबत खुनाचा गुन्हा नोंद करीत तपास सुरू केला होता. Nephew killed uncle
याप्रकरणी नांदेड पोलिसांनी एकनाथ बंडू जाधव याला अटक केली, पोलिसी खाक्या दाखविताचं आरोपी एकनाथ ने हत्या केल्याची कबुली दिली.
हत्येच कारण ऐकून पोलिसही अवाक झाले.
आरोपी एकनाथ व दिगम्बर काकडे हे मामा भाचे होते, एकनाथ अवघ्या 19 वर्षाचा आहे, त्याने मामा ला त्यांच्या मुलीसोबत लग्न करायचे आहे अशी इच्छा त्याने मामा जवळ व्यक्त केली. Crime update
मात्र मामा ने मी माझ्या मुलीचे लग्न तुझ्यासोबत करणार नाही असा स्पष्ट नकार दिला, कारण एकनाथ हा काही काम करीत नव्हता.
हदगाव पोलिसांनी अवघ्या 5 दिवसात या हत्याकांडाचा छडा लावला, पोलीस निरीक्षक विजय चव्हाण यांच्या नेतृत्वात पोलीस कर्मचाऱ्यांनी यशस्वी कामगिरी केली.