सानिका भागवत हीने गळफास लावून आत्महत्या केली. तर आकांक्षाने इमारतीच्या पाचव्या मजल्यावर उडी टाकली आणि जीव दिला. सानिका हीने राहत्या घरातच गळफास लावून घेतल्यानं तिच्या कुटुंबीयांना मोठा धक्काच बसला. Pune suicide case
सानिकाने गळफास घेतला असता तिचा मृतदेह रुग्णवाहिकेत नेत असताना तिचा मृतदेह आकांक्षा ने बघितला, सानिका ला नेत असताना आकांक्षाने पाचव्या मजल्यावरुन उडी टाकल्यामुळे तिचा जागीच मृत्यू झाला. आकांक्षाने पाचव्या मजल्यावरुन जेव्हा उडी टाकली, तेव्हा ती वरुन थेट एका रुग्णवाहिकेच्या जवळच कोसळली. पाचव्या मजल्यावरुन कोसळल्यामुळे आकांक्षाला मोठ्या प्रमाणात गंभीर जखम होऊन ती रक्तबंबाळ झाली होती.
दोन्ही मैत्रिणीच्या आत्महत्येचा एकमेकांशी काय संबंध आहे याचा तपास हडपसर पोलीस करीत आहे, एकाच दिवशी दोघांच्या आत्महत्या का बरं? असा प्रश्न कुटुंबियांना देखील पडला आहे.