News34 chandrapur
चंद्रपूर - 1 ऑक्टोबर ला चंद्रपूर शहरात सलग 4 दिवस माता महाकालीचा गजर होणार आहे.
नवरात्री निमित्त श्री महाकाली माता सेवा समितीच्या वतीने संयोजक आमदार किशोर जोरगेवार यांच्या संकल्पनेतून भव्य महाकाली महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. Mahakali mahotsav
चंद्रपूर जिल्हा महाकाली मातेचं शक्तीपीठ म्हणून ओळखल्या जाते, या माता महाकाली मंदिर परिसरात भाविक भक्तांसाठी महाकाली महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
1 ऑक्टोबर पासून सुरू होणाऱ्या महोत्सवात पहिल्यांदाच माता महाकाली ची भव्य पालखी निघणार आहे. Mla kishor jorgewar
माता महाकाली परिसरात माहुरगड येथील प्रसिद्ध बाळू महाराज यांचे श्रीमद माता महाकाली भागवत कथा कार्यक्रम, चैताली खटी यांचे महाराणी हिराई एकपात्री नाटक, प्रसिद्ध जागरणकार अजित मिनोचा यांचे देवी जागरण, उमेश शर्मा, नेतल शर्मा यांची भजनसंध्या होणार आहे.
2 ऑक्टोबर ला सायंकाळी माता महाकाली भव्य पालखी शोभायात्रा, या पालखीत अश्वारूढ राणी हिराईचे बोलके दृश्य, नवं दुर्गांचे दृश्य, शिवगर्जना ढोल ताशा 111 वादकांचे पथक, शहरातील संपूर्ण बँड पथक समूह, गायत्री परिवारातील 100 महिलांचा कळस, 100 महिलांचे लेझीम पथक, 100 महिलांचे ध्वजधारी पथक, बाहुबली हनुमान यांचं दृश्य, योग नृत्य परिवार, आदिवासी पारंपरिक नृत्य समूह, नांदेड जिल्ह्यातील बंजारा नृत्य समूह, 100 मुला-मुलींचे कराटे प्रात्यक्षिक दृश्य, 80 वादकांचा जगदंब ढोल पथक, अनेक सामाजिक संघटनेचा पालखीत सहभाग व विशेष आकर्षण हर हर शंभू फ्रेम गायिका अभिलीप्सा पांडा यांचा रोड शो राहणार आहे.
अशी माहिती समिती संयोजक आमदार किशोर जोरगेवार यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून दिली आहे.
4 ऑक्टोम्बरला 999 कन्यांचे कन्या भोजन व महाप्रसादाने महाकाली महोत्सवाचे समापन करण्यात येईल.
सदर पालखी सोहळ्यात श्री माता महाकालीची 8 किलोची चांदीची मूर्ती व पादुका चा समावेश असणार आहे. Mahakali mandir chandrapur
महाकाली मंदिर परिसरात प्रथम आयोजित होणाऱ्या महाकाली महोत्सवात नागरिकांनी मोठ्या संख्येत सहभाग घ्यावा असे आवाहन आमदार किशोर जोरगेवार यांनी नागरिकांना केले आहे.

