News34 chandrapur
बल्लारपूर - तालुक्यात आजही छुप्या पद्धतीने वन्यप्राण्यांची शिकार होत आहे, असेच एक प्रकरण 28 सप्टेंबरला उघडकीस आले असून उमरी मधील सातारा भोसले गावात एकाच्या घरी वन्य प्राण्यांचे मास लपविले अशी गोपनीय माहिती वन कर्मचाऱ्यांना मिळाली.
माहितीच्या आधारे ज्ञानेश्वर विश्वनाथ गावंडे यांच्या घरी वन कर्मचारी व अधिकारी यांनी धाड मारली असता त्यांच्या घरी वन्यप्राण्यांचे मास सुकवा मिळून आले. Ballarpur crime
मासाबाबत चौकशी केली असता ते मास चितळाचे असल्याचे निदर्शनास आले.
वन्यप्राण्यांची विल्हेवाट लावण्यासाठी सदर प्रकरणात आरोपी कैलास बाबुराव कन्नाके व श्रीनिवास विठ्ठल पेंदोर यांचा सहभाग असल्याचे आढळून आले.
आरोपी जवळून 2 लोखंडी कुऱ्हाड, 1 सुरा, 1 बांबूचा ताटवा जप्त करण्यात आला, त्या चितळाचे उर्वरित अवयव शोधण्यासाठी तिन्ही आरोपींना मोका चौकशीसाठी नेण्यात आले. Crime news
जंगल परिसरात चितळाचे मुंडक्यासह शिंग, चामडे व पाय वन कर्मचाऱ्यांनी जप्त केले. त्या अवयवांचा पंचनामा करीत दहन करण्यात आले. Chital hunting
तिन्ही आरोपीवर वन गुन्हा दाखल करण्यात आला आहे, सदर प्रकरणाचा पुढील तपास उपवनसंरक्षक मध्यचांदा चंद्रपूर श्रीमती श्वेता बोडडू, सहायक वनसंरक्षक श्रीकांत पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी नरेश भोवरे करीत आहे.

