News34 chandrapur
चिमूर - चिमूर तालुक्यात अवैध रेती वाहतूक संदर्भात सोशल मीडियावर थोडक्यात मजकूर व रेती तस्करीचे फोटो पोस्ट केल्याने दोन रेती व्यावसायिकांनी sand mafia पत्रकाराला जिवे मारण्याची धमकी दिल्याने रेती व्यावसायिक विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. Threat to journalist
Chandrapur crime news
दिनांक 29 सप्टेंबर रोजी दुपारी 2 वाजताच्या दरम्यान चिमूर शहरातील जुना बस स्टॉप येथे रेती व्यवसायिक भूषण सातपुते व गोलू भरडकर यांनी पांढरया रंगाच्या Swift गाडीने येऊन जिवे मारण्याची धमकी दिली असल्याची तक्रार पत्रकार विलास मोहिंनकर यांनी चिमूर पोलीस स्टेशन ला दिली असून पोलीस स्टेशन मध्ये भारतीय दंड संहिता 1860 अंतर्गत कलम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे, पुढील तपास चिमूर पोलीस करीत आहे.
