News34 chandrapur
चंद्रपूर - ऐतिहासिक चंद्रपूरची आराध्यदैवत असलेल्या महाकाली देवीच्या नवरात्रोत्सवाला घटस्थापनेने आजपासून सुरुवात झालीय. पहिल्याच दिवशी चंद्रपूरच्या देवीचं दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केलीय.
कोरोनाचे निर्बंध पूर्णपणे हटवण्यात आल्यामुळे यंदा महाकालीचं नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतोय.
26 सप्टेंबरला पहाटे 5 वाजता पासून माता महाकालीची पूजा संपन्न करीत महाआरती करण्यात आली, महाआरती नंतर भाविकांना दर्शनासाठी मंदिर खुले करण्यात आले.
नवरात्रच्या पहिल्याच दिवशी भाविकांनी हजारोच्या संख्येत गर्दी केली होती, यंदा भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. अशी प्रतिक्रिया मंदिर विश्वस्तांनी दिली.