News34 chandrapur
चंद्रपूर - राज्यात सध्या मुलांना पळविणाऱ्या टोळी बद्दल चर्चा सुरू आहे, या अफवेमुळे अनेकांनी नाहक मार ही खाल्ला आहे.
मात्र मुलांना पळविणारे एकही प्रकरण घडले नाही, परंतु समाजमाध्यमांतुन नागरिक टोळी आली आहे, सतर्क रहा असा मॅसेज सर्वत्र पसरवीत आहे. Chandrapur police
यामुळे अनेक गावात फिरून कपडे विकणारे, साधू अश्यांचे फिरणे ही कठीण झाले असून यावर आता पोलिसांनी कठोर पाऊले उचलायला सुरुवात केली आहे. Chile kidnapping gang
खोटा मॅसेज पसरविणार तर त्यांच्यावर कारवाईचा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे.
चंद्रपूर जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करीत, कोणत्याही अफवेला बळी न पडण्याची विनंती केली आहे. Chandrapur crime
असे प्रकरण अद्याप जिल्ह्यात घडले नाही, जर असं काही घडत असेल तर नागरिकांनी तात्काळ संबंधित पोलीस स्टेशनला तक्रार द्यावी.
चंद्रपूर पोलीस लगेच कारवाईसाठी तत्पर असेल, पण खोट्या माहिती पसरवू नका असे आवाहन अरविंद साळवे यांनी यावेळी केले.