News34 chandrapur
मुंबई/चंद्रपूर - सोशल मीडियाचा अति वापर वाढल्याने कोणत्याही खोट्या अफवा पसरविण्याचे प्रमाण वाढले आहे, अश्या खोट्या अफवांवर नागरिक सुद्धा विश्वास करू लागले, मात्र या अफवेवर विश्वास ठेवल्याने अनेक अनुचित घटना राज्यात घडत आहे.
Social media rumors
Social media rumors
गेल्या काही दिवसांत राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी मुलं चोरणारी टोळी आहे समजून मारहाणीच्या घटना घडल्या आहेत. या वाढलेल्या घटनांमुळे पालकांमध्ये चिंतेचं वातावरण असल्याचंही अधोरेखित झालं आहे. Child kidnapping Gang
मुलं चोरणारी टोळी सक्रिय आहे, ते तुमच्या आसपास येऊ शकते, अशा आशयाचे अनेक मेसेज सध्या व्हॉट्सअपवर व्हायरल झालेत. त्यामुळे पालक धास्तावलेत. rumor
पोलिसांनी सुद्धा समाज माध्यमांद्वारे नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे.
पालकांनी सतर्क राहावं आणि अफवांना खतपाणी घालू नये, असं सांगण्यात आलंय. गेल्या काही आठवड्याभरापासून राज्यातील महत्त्वाच्या शहरात मुलं चोरणारी टोळी सक्रिय असल्याच्या अफवा पसरवल्या जात आहेत. Viral fake message
माहितीची शहानिशा न करता खोटी माहिती शेअर करणाऱ्या नागरिकांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशाराही पोलिसांनी दिला आहे. व्हॉट्सअप, फेसबुकसह अन्य सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मेसेज, व्हिडीओ, फोटोच्या माध्यमातून व्हायरल मेसेज पसरवण्यात आले होते. Crime news
गेल्या काही दिवसांत राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी मुलं चोरणारी टोळी आहे समजून मारहाणीच्या घटना घडल्या आहेत. या वाढलेल्या घटनांमुळे पालकांमध्ये चिंतेचं वातावरण असल्याचंही अधोरेखित झालं आहे.
अनेक ठिकाणी मारहाणीच्या घटना घडल्या होत्या. गैरसमजूतीन मारहाणीचे प्रकार उघडकीस आले होते. अफवेतूनच हे प्रकार घडल्याचंही पोलिसांच्या तपासातून समोर आलं होतं. तशी माहितीही स्थानिक पोलिसांनी दिल्यानंतर लोकांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं होतं. दरम्यान, अशा घटनांमुळे गावोगावी जावून वस्तू विकणाऱ्या, हातावर पोट असणाऱ्या लोकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे त्यांच्या समोर रोजी रोटीचा प्रश्नही निर्माण झालाय.