News34 chandrapur
चंद्रपूर - चंद्रपूर - गुणवत्ता व पटसंख्या नसल्याने चंद्रपूर जिल्ह्यातील काही शाळा बंद करण्याचा निर्णय जिल्हा परिषदेने घेतला होता.
शाळा बंद झाल्या तर जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांचं काय होणार असा प्रश्न यावेळी उपस्थित झाला आहे. Chandrapur zilla parishad
बल्लारपूर तालुक्यातील विसापूर गावातील शाळा बंद करणार असा निर्णय जिल्हा परिषदेने घेतला होता.
जिल्हा परिषदेच्या या निर्णयाविरोधात ग्रामपंचायत सदस्यांनी एकमत होत गाववासीयांना सोबत घेत शिक्षक दिनाला भव्य मोर्चा जिल्हा परिषदेवर काढला.
सदर मोर्च्यात वंचित बहुजन आघाडी जिल्हाध्यक्ष भूषण फुसे, ग्रामपंचायत सरपंच व सदस्य सहित अनेक नागरिक व विद्यार्थ्यांनी मोर्च्यात सहभाग नोंदविला. Quality, quantity
विसापूर गावातील शाळा बंद केल्यास आम्ही जिल्हा परिषदे समोर मरेपर्यंत आमरण उपोषण करू असा इशारा यावेळी देण्यात आला होता.
शिक्षक दिन असल्याने जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकांचा सन्मान कार्यक्रम जिल्हा परिषदेच्या सभागृहात सुरू होता. Teacher day 2022
कार्यक्रमातील प्रमुख आमदार किशोर जोरगेवार यांना विसापूर गावातील नागरिकांचा मोर्चा आला असल्याचे समजले तेव्हा त्यांनी लगेच त्यांची समस्या जाणून घेत अवघ्या 5 मिनिटात जिल्हा परिषदेचा आदेश रद्द केला. Mla kishor jorgewar
आमदार जोरगेवार यांनी गावातील नागरिकांना नम्र आवाहन करीत शाळेची पटसंख्या कशी वाढणार याकडे आपण लक्ष द्यावे, विशेष म्हणजे आपल्या गावातील नागरिकांना शिक्षणाच्या महत्वाची जाणं आहे ही अभिनंदनास्पद बाब आहे असे सांगत नागरिकांचे आभार मानले.
विशेष म्हणजे सदर समस्या ही मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या विधानसभा क्षेत्रातील होती पण सामाजिक व गंभीर समस्या असल्याने आमदार जोरगेवार यांनी पुढाकार घेत समस्या मार्गी लावली.