News 34 chandrapur
चंद्रपूर/गडचिरोली - ट्रान्सपोर्ट व्यावसायिकाचे काम सुरळीत चालू राहण्याकरिता व व्यावसायिकांवर दाखल असलेल्या गुन्ह्यात मदत करणेकरिता पोलीस निरीक्षकाने 1 लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली. Police bribeलाचेची पैसे शासकीय वाहनात ठेवायला सांगितले असता चंद्रपूर लाचलुचपत विभागाने लाचखोर पोलीस निरीक्षकाला ताब्यात घेतले. Bribe
फिर्यादी हा गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी नागेपल्ली पोस्ट आलापल्ली येथे राहतात.
फिर्यादी हे ट्रान्सपोर्ट व्यावसायिक आहे, फिर्यादी यांचेवर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहे सदर गुन्ह्यात त्यांच्यावर कठोर कारवाई होऊ नये व फिर्यादी यांचा ट्रान्सपोर्ट व्यवसाय सुरळीत चालावा यासाठी अहेरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्याम गोविंदराव गव्हाणे यांनी फिर्यादीला तब्बल 1 लाख रुपयांची लाच मागितली. Police inspector arrested
फिर्यादीला लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी याबाबत चंद्रपूर लाचलुचपत विभागात तक्रार दाखल केली, तक्रारीची पडताळणी केल्यावर चंद्रपूर लाचलुचपत विभागाने सापळा रचला.
शिक्षक दिनी पोलीस निरीक्षक गव्हाणे यांनी फिर्यादीला अहेरी पोलीस स्टेशनच्या आवारात उभे असलेल्या शासकीय वाहनात 1 लाख रुपये ठेवायला सांगितले असता चंद्रपूर लाचलुचपत विभागाने तात्काळ पोलीस निरीक्षक गव्हाणे यांना ताब्यात घेतले. Chandrapur anti corruption department
सध्या गव्हाणे यांची चौकशी सुरू आहे.
सदरची कारवाई राकेश ओला पोलीस अधीक्षक, मधुकर गीते अप्पर पोलीस अधीक्षक, पोलीस उपअधीक्षक अविनाश भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शिल्पा भरडे यांच्या नेतृत्वात पोलीस कर्मचारी नरेश ननावरे, संदेश वाघमारे, रवी ढेंगळे, वैभव गाडगे चंद्रपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली.