News34 chandrapur
चंद्रपूर - महानगरपालिका क्षेत्रातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रभागात माहेरघर समोर एका मोठ्या नाल्याचे काम संबंधित नगरसेवक यांच्या दुर्लक्षपणामुळे ठेकेदाराने अर्धवट ठेवल्याने तेथील जनतेला वाहत आलेली घाण यामुळे नाहक त्रास सहन करावा लागत होता. Aam Aadmi party
वारंवार नगरसेवकांकडे जाऊन सुद्धा प्रश्न मार्गी लागत नसल्याने तेथील जनतेने आप चे राजू कुडे यांच्याकडे मदत मागितली या संदर्भात महानगरपालिका प्रशासनाला ही बाब लक्षात आणून देऊन त्याचा पाठपुरावा केला आणि आज तिथे कामाला सुरुवात झाली असून त्या कामाचे भूमिपूजन तेथील जनतेला सोबत घेऊन करण्यात आले. नाल्यात घाण साचलेल्या पाण्यामुळे डेंगू, मलेरिया सारख्या आजाराने लोक त्रासलेले होते या नाल्याच्या कामामुळे लोकांचा हा त्रास कायमचा मिटणार म्हणून येथील जनतेने आपचे राजू कुडे आणि आम आदमी पार्टीचे आभार मानले.
यावेळी आम आदमी पार्टीचे शहर सचिव राजू कुडे झोनचे संयोजक रहमान खान पठाण प्रभाग सह संयोजक अजय बाथव, जयदेव देवगडे कृष्णाजी सहारे, अनुप तेलतुंबडे, सुजाता बोदेले, विनोद रेब्बावार, विजय तोडासे, विशाल रामगिरीवर, मुकेश आलम, अनुज गुड्डू, भीमराज बगेसर, चंदु माडूरवार, रावळकर ताई चांदेकर ताई इत्यादी उपस्थित होते.