News34 chandrapur
भंडारा येथे एका महाविद्यालयात कार्यरत सोहम वासनिक या प्राध्यापकाने फेसबुक, मॅट्रीमोनी साईटवर खोट्या नावाने आयडी बनवीत विविध महिलांशी मैत्री करीत त्यांचा विश्वास संपादन करीत फसवणूक करण्याचे काम करीत होता. crime
मात्र त्या प्राध्यापकाचा गुन्हा चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेने पकडत त्या गुरुजी ला अटक केली.
सोहम वासनिक याने चंद्रपूर जिल्ह्यातील कोठारी तालुक्यातील एका 67 वर्षीय विधवा महिलेला फेसबुक च्या माध्यमातून मैत्री केली. Chandrapur crime
त्या महिलेचा विश्वास संपादन करीत सोहम त्या महिलेला कोठारी येथील घरी पोहचला, तिच्या राहत्या घरी सोहम ने मुक्कामही केला, सकाळी महिला मॉर्निंग वॉक ला गेल्यावर संधीचा फायदा घेत सोहमने त्या महिलेच्या घरी असलेले 24 तोळे सोने लांबविले. Chandrapur police
याबाबत कोठारी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला होता.
सदर गुन्ह्याचे गांभीर्य बघता जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांनी सदर गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे वळता करीत गुन्हा उघडकीस आणण्याचे निर्देश दिले.
पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांनी पोउपनी अतुल कावळे यांच्या नेतृत्वाखाली पथक बनवीत तपास सुरू केला.
गुन्ह्यातील तांत्रिक बाबी तपासून बघितले असता गुन्हे शाखेचे पथक भंडारा रवाना झाले.
आरोपीची कसून चौकशी केली असता त्याने सुमित बोरकर या नावाने फेसबुक व जीवनसाथी वर फेक आयडी बनवीत विधवा महिलांसोबत सम्पर्क साधायचा. Local crime branch chandrapur
माझी पत्नी मयत झाली असून मला एक मुलगी असे सांगत होता, स्वतःला MBBS, स्त्रीरोग तज्ञ व अकोला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे कार्यरत असल्याची माहिती महिलांना देत होता.
मला 1 लाख 44 हजार रुपये वेतन असल्याची खोटी स्लिप महिलांना पाठवीत होता, महिलांशी सम्पर्क साधत सोहम त्यांच्या घरी जाऊन सध्या आर्थिक अडचण आहे असे सांगत पैश्याची मागणी करीत होता पैसे न दिल्यास सोहम महिलांच्या घरी चोरी करीत होता.
आरोपी सोहम वासनिक कडून 290 ग्राम सोने दोन मोबाईल असा एकूण 12 लाख 3 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.