News34 chandrapur
भंडारा - राज्यात यंदा मोठ्या प्रमाणात पाऊस पडला, पावसाने शेतकरी व नागरिकांचे मोठे हाल केले, अनेक ठिकाणी पूर आला, असंख्य नागरिकांचा मृत्यू झाला.
मात्र भंडारा जिल्ह्यातील गोबरवाही येथे आभाळातून मृत्यू कोसळला यामध्ये दोघांचा मृत्यू झाला.
गोबरवाही पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हिरापूर हमेशा धरणावर 48 वर्षीय दिनेश खुणे रा. पुलपट्टा मध्यप्रदेश व बुधराम हांडके रा.हिरापूर तुमसर हे दोघे मासेमारी करण्यासाठी कोल्हापुरी बंधाऱ्यावर गेले होते. Lightning strike
मासे पकडल्यानंतर परत येत असताना अचानक मेघगर्जनेसह पाऊस सुरू झाला. यामुळे दोघेही सिमेंट बंधाऱ्याजवळील बेलाच्या झाडाखाली थांबले. मात्र त्याचवेळी अचानक वीज कोसळली. Fishing
यात दोघेही जखमी होऊन नाल्याच्या पाण्यात पडले. काही अंतरापर्यंत वाहून गेल्याने त्यांचा मृत्यू झाला. याची माहिती पोलिसांना मिळताच पथकासह पोलीस घटनास्थळी पोहोचले. दोघांचा शोध घेण्यासाठी मोहीम हाती घेण्यात आली. अखेर दुसऱ्या दिवशी दोघांचेही मृतदेह नाल्याच्या काठावर आढळून आले आहेत. शवविच्छेदनानंतर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.
