News34 chandrapur
घुग्गुस - भूस्खलन च्या घटनेनंतर आता वेकोली व्यवस्थापन wcl जमिनीच्या हद्दीत राहणाऱ्या नागरिकांना 7 दिवसांच्या आत घर खाली करण्याचे आदेश दिले आहे.
Wcl च्या जागेवर सेवानिवृत्त कर्मचारी व ज्यांचा वेकोली शी काही संबंध नाही अश्या व्यक्तींना wcl ने घर खाली करण्याचा फर्मान काढला आहे, दररोज लाऊडस्पीकर द्वारे नागरिकांना घर खाली करण्याच्या सूचना देण्यात येत आहे.
शहरातील सुभाष नगर, राम नगर, इंदिरा नगर, शिव नगर, गांधी नगर व शास्त्रीनगर परिसरातील नागरिकांना सूचना देण्याचं काम सध्या सुरू आहे.
जर 7 दिवसांच्या आत वेकोली क्वार्टर व घर खाली करणार नसेल तर त्या घरचा विद्युत पुरवठा व पाणी पुरवठा बंद करण्याचा इशारा वेकोली ने दिला आहे. सोबतच घर खाली न करणाऱ्यांवर फौजदारी कारवाई सुद्धा करण्यात येईल.
वेकोली च्या आदेशाने अतिक्रमण धारक व सेवानिवृत्त नागरिकांमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे.
सध्या च्या परिस्थितीत वेकोली मधून सेवानिवृत्त झालेले कर्मचारी आजही क्वार्टर मध्ये राहतात, सेवानिवृत्त नागरिकांची ग्रॅच्युएटी मधून 3 हजार रुपये दर महिन्याला कापण्यात येत आहे.
वेकोली वसाहतीत दुरुस्ती न केल्याने अनेकदा त्या ठिकाणी दुर्घटना घडल्या आहे, शिवनगर भागात अनेक नागरिकांचे पुनर्वसन वेकोली ने केले होते मात्र आता त्याठिकाणी राहणाऱ्या नागरिकांना सुद्धा घर खाली करण्याचे निर्देश दिले आहे.
नागरिकांसमोर बिकट परिस्थिती उदभवली असताना राष्ट्रवादी व कांग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी खासदार बाळू धानोरकर यांची भेट घेत या समस्येवर तोडगा काढण्याची विनंती केली आहे.
घुग्गुस सारख सध्या चंद्रपुरातील लालपेठ भागात वेकोलीने सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना क्वार्टर खाली करण्यासंबंधी नोटीस बजावले आहे.

