News34 chandrapur
गडचांदूर - विलास वासुदेव मांडवकर यांच्या शेतविक्री व्यवहारात काही जणांनी गैरव्यवहार केल्याने विलास यांनी विष प्राशन करीत आत्महत्या केली. 5 एकर शेतीचा सौदा 60 लाख रुपयात करण्यात आला होता. मांडवकर यांची जमीन हायवेलगत असल्याने त्याचा योग्य मोबदला मिळावा अशी अपेक्षा मांडवकर यांची होती. Land mafia
त्या 5 एकरची रजिस्ट्री करण्याऐवजी तब्बल 11.5 एकर शेतीची रजिस्ट्री करण्यात आली. यामध्ये दिनेश सोनी, मनोज शर्मा, बाळू घायवनकर, गजानन गाणफाले, पंकज गंपावार यांचा सहभाग होता. त्या 5 एकर शेतीचा सौदा शरद जोगी यांचेसोबत झाला होता. मात्र 5 एकरच्या ठिकाणी 11.5 एकर जमिनीची जोर जबरदस्तीने रजिस्ट्री करण्यात आली. शेतीचे पैसे चेक द्वारे देण्यात आले, पण दबाव टाकत एक चेक परत घेऊन गेले, दुसरा चेक वटला ते पैसे परत दे अन्यथा तुझ्या मुलांना मारणार अशी धमकी मांडवकर यांना मिळाली. यामुळे त्यांचं मानसिक संतुलन बिघडले आणि त्यांनी विष प्राशन करून आत्महत्या केली. सर्व घटनेचा उल्लेख विलास मांडवकर यांच्या सुसाईड नोट मध्ये केला आहे. गडचांदूर क्षेत्र औद्योगिक दृष्ट्या वाढत असून आजूबाजूला असलेली शेती शेतकरी विकत आहे, मात्र असे असताना गडचांदूर मधील भूमाफिया शेतकऱ्यांवर दबाव टाकत बळजबरीने जमीन हिसकावण्याचा प्रयत्न करीत आहे. मांडवकर यांच्या सुसाईड नोट मध्ये ज्या शरद जोगी चा उल्लेख आहे ते गडचांदूर नगरपरिषदेचे नगर उपाध्यक्ष तथा राष्ट्रवादी कांग्रेसचे नेते आहे. गडचांदूर पोलीस मांडवकर यांच्या आत्महत्येला जबाबदार असणाऱ्या आरोपींवर कारवाई करणार काय? याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
Vilas Vasudev Mandavakar committed suicide by consuming poison after some people misbehaved in his farm sale. A 5 acre farm deal was made for Rs 60 lakh. Since Mandavkar's land is next to the highway, Mandavkar expected that he should get a fair compensation. Instead of registering that 5 acres, as many as 11.5 acres of agriculture was registered. Dinesh Soni, Manoj Sharma, Balu Ghaivankar, Gajanan Ganphale, Pankaj Gampawar participated in this. The deal of that 5 acre farm was done with Sharad Jogi. However, 11.5 acres of land was forcibly registered on a 5 acre site. The farm money was paid by cheque, but under pressure one check was returned, the other check was returned to Vat and Mandavkar threatened to kill your children. This disturbed his mental balance and he committed suicide by consuming poison. All the incidents are mentioned in the suicide note of Vilas Mandavakar. Gadchandur area is growing industrially and the farmers are selling the surrounding farms, but at the same time land mafia in Gadchandur is pressuring the farmers and trying to grab the land by force. Sharad Jogi, who is mentioned in Mandavakar's suicide note, is the Municipal Vice President of Gadchandur Municipal Council and a Nationalist Congress leader. Will the Gadchandur police take action against the accused responsible for Mandavkar's suicide? This has attracted the attention of citizens.
