News34 chandrapur
गडचिरोली - मुलचेरा तालुक्यातील शांतीग्राम या गावातून सुरजागड येथे लोहखनिजाची वाहतूक करणारे ट्रक मुळे आज दुपारच्या सुमारास अपघात घडला.
Gadchiroli fire
Gadchiroli fire
या अपघातात बिजोली जयदार नामक महिलेचा जागीच मृत्यू झाला, महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती गावातील नागरिकांना मिळाली असता त्यांनी घटनास्थळी धाव घेतली, संतप्त झालेल्या गावाकऱ्यांनी एक एक करत तब्बल 9 वाहणांनां आग लावली.
नागरिकांनी जड वाहतुकीला कंटाळून प्रशासनाला पर्यायी मार्ग काढून वाहतूक करावी अशी मागणी अनेक दिवसापासून प्रलंबित होती, मात्र ती पूर्ण झाली नाही, अखेर आज ही घटना घडली.
शांतीग्राम गावाजवळून अनेक जड वाहतुकीची वाहने भरधाव् वेगात त्या ठिकाणांहून जात असतात.
संतप्त नागरिकांच्या या कृत्याने प्रशासन सुद्धा धास्तावले आहे.
