News34 chandrapur
सदर इमारत ही पुंडलिक पाटील यांच्या मालकीची असुन ती तब्बल 60 ते 70 वर्ष जुनी इमारत होती.
मागील 2 दिवसापासून ती इमारत हलत असल्याने तिथे राहत असलेले भाडेकरू यांनी घर खाली केले होते.
आज 2 भाडेकरू घर खाली करीत होते, त्यावेळी शहिस्ता खान नामक महिला इमारतीच्या आत गेली त्यावेळी ती इमारत कोसळली.
इमारतीच्या मलब्याखाली ती महिला तब्बल 3 तास बाहेर पडण्याचा संघर्ष करीत होती.
प्रशासनाने तात्काळ बचाव कार्य सुरू केल्याने महिलेचा जीव वाचला.
सदर इमारत पडण्याचा थरारक व्हिडीओ समोर आला आहे.
