News34 chandrapur
चंद्रपूर - चंद्रपूर शहरात आज घडलेल्या एका घटनेने चंद्रपूर रेल्वे पोलीस चक्रावले. 30 सप्टेंबरला दुपारी 4 वाजताच्या सुमारास वरोरा नाका बाळासाहेब ठाकरे रेल्वे उड्डाणपुलाच्या खाली एक युवक पडला असल्याची माहिती मिळाली होती.
मात्र त्या ठिकाणी काही और चं चित्र होते, एक युवक साधारणतः 35 ते 40 वयोगटातील हैद्राबाद ते राजस्थान राज्यात जाणाऱ्या रेल्वेत बसला होता, railway police chandrapur मात्र चंद्रपूर स्थानकातून रेल्वे पुढे निघाल्यावर राधाकृष्ण टॉकीज जवळ तो युवक धावत्या रेल्वेतून पडला. तो युवक पडल्यावर परिसरातील काही युवक त्याला वाचविण्यासाठी धावले. त्याला नाव विचारले तर पठाण माझे नाव असे त्याने सांगितले. काही वेळात चंद्रपूर रेल्वे पोलीस दाखल झाली. त्या युवकाची विचारपूस करू लागली. जखमी अवस्थेत असलेल्या त्या युवकांवर उपचार करण्यात आला. त्यानंतर त्याचं नाव विचारले असता आधी पठाण नंतर रंजित असे उडवाउडवीची उत्तरे त्याने दिली. इतकेच नव्हे तर तो कुटुंबातील सदस्यांचा मोबाईल क्रमांक पोलिसांना देत नव्हता. आधी तो म्हणाला की माझ्यासोबत आई-बाबा, पत्नी व मुले आहे, पण नंतर तो कुटुंबातील सदस्यांबद्दल काही सांगत नव्हता. त्या युवकांच्या खिश्यात रेल्वे तिकीट आढळून आले. त्या युवकाकडे मोबाईल सुद्धा नव्हता, पोलिसांनी त्याची चौकशी केली मात्र तो काहीच माहिती देत नसल्याने तो मतिमंद तर नाही न? असा प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण झाला. तो युवक कोण? हे सध्यातरी पोलिसांसमोर न सुटणार कोडचं आहे. मात्र रेल्वे पोलीस त्याच्याबद्दल माहिती घेत आहे.