News34 chandrapur
वरोरा - 10 दिवसीय सार्वजनिक गणेशोत्सव चंद्रपूर जिल्ह्यात उत्साहात साजरा केल्यावर 9 सप्टेंबरला मोठ्या जल्लोषात भाविक बाप्पाला निरोप देणार आहे. श्री गणेश विसर्जनात कसलीही अप्रिय घटना घडू नये यासाठी वरोरा पोलिसांनी 8 सप्टेंबर ते 11 सप्टेंबर पर्यंत 40 जणांना हद्दपारीची नोटीस बजावली आहे. Deportationवरोरा शहरात गणपतीचे विसर्जन शांततेत पार पडावी यासाठी तालुक्यातील गुंड व गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांवर कलम 144 अंतर्गत 40 लोकांवर हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे.
सदरचा प्रतिबंधित आदेश उपविभागीय पोलीस अधिकारी आयुष नोपाणी यांच्या आदेशावर ही कारवाई करण्यात आली आहे. Ganesh Visarjan
तसेच गुन्हेगारी व शांतता भंग करणारे यांचेवर कलम 107, 116 (3) अनव्ये प्रतिवृत्त पाठविण्यात आले आहे. Warora police
13 लोकांकडून चांगल्या वागणुकीचे अंतिम बंधपत्र घेण्यात आले आहे, तसेच विसर्जन दरम्यान कुठलाही दखलपात्र/अदखलपात्र गुन्हा करू नये म्हणून कलम 149 सीआरपीसी प्रमाणे 113 इसमाना शांतता राखण्यासाठी नोटीस बजावण्यात आले आहे.