News34 chandrapur
ब्रह्मपुरी - शहरातील उच्चभ्रू वसाहतीमध्ये अल्पवयीन मुलीकडून देहविक्री चे काम पती-पत्नी करीत होते, मात्र त्यांच्या या कृत्याला चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेने चांगलाच चाप दिला.
Crime news
Crime news
17 सप्टेंबर रोजी नागपूर येथील सामाजिक संस्थेने स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूरचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांना सम्पर्क साधत चंद्रपूर जिल्ह्यात 14 वर्षाच्या अल्पवयीन मुलीकडून देहविक्री केली जात असल्याची माहिती दिली. Lcb chandrapur
घटनेची गंभीरता बघता जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांना याबाबत सूचना देत माहिती दिली, यावर तात्काळ पोलीस अधीक्षकांनी प्रकरणाचा छडा लावण्याचे निर्देश दिले. Minor girl
बाळासाहेब खाडे यांनी सपोनि संदीप कापडे यांच्या नेतृत्वाखाली पथक तयार केले. Sex racket
ब्रह्मपुरी येथील मालडोंगरी मार्गावरील विदर्भ इस्टेट कॉलोनी बंगला क्रमांक 14 येथे 1 डमी ग्राहक पाठवीत प्रकरणाची शहानिशा केली.
त्यानंतर सापळा रचत धाड मारली व पीडित अल्पवयीन मुलीची सुटका केली. prostitution
मुलीची चौकशी केली असता तिने अजून एक धक्कादायक माहिती पोलिसांना दिली.
सदर अल्पवयीन मुलीला कलकत्ता येथून एका महिलेने अपहरण करीत नागपूर येथील दलालाला विकले. Kidnapping and prostitution
नागपूर येथील दलालाने त्या अल्पवयीन मुलीकडून विविध ठिकाणी देहविक्री करायला लावली.
या प्रकरणात आरोपी 40 वर्षीय मंजित रामचंद्र लोणारे व 32 वर्षीय चंदा मंजित लोणारे यांना ताब्यात घेत अटक केली.
पोलिसांनी पोस्को सहित विविध कलमानंतर्गत विविध गुन्हे दाखल केले. Dirty business
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, उपविभागीय पोलीस अधिकारी मिलिंद शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्या नेतृत्वात ठाणेदार मनोज गजभे, सपोनि संदीप कापडे, सपोनि मंगेश भोयर, आदींनी यशस्वी केली.
