News34 chandrapur
चंद्रपूर : देशात मैत्रेय व सहारा इंडिया या कम्पणीने नागरिकांना चांगल्या परताव्याचे आमिष दाखवीत हजारो कोटींचा घोटाळा केला, आजही नागरिकांचे पैसे परत मिळाले नाही. Sahara india
असाच एक घोटाळा विदर्भात झाला मात्र घोटाळेबाज कंपनीला राजकीय साथ मिळाली व त्यांनी हा घोटाळा पुढे सुरू ठेवला.
कलकाम रिअल इस्टेट कंपनीने मोठ्या परताव्याचे अमिश दाखवून गुंतवणूकदारांकडून मोठ्या प्रमाणात पैसे गोळा केले. चंद्रपूर जिल्ह्यातील ही रक्कम तीस कोटींपेक्षा अधिक आहे. मात्र गुंतवणूकदारांना त्यांची फसवणूक झाल्याचे निदर्शनास येताच त्यांनी हे पैसे परत करण्यासाठी तगादा लावला. या संपूर्ण प्रक्रियेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांवर गंभीर आरोप गुंतवणूकदारांनी केले आहे.
मनसे नगरसेवक सचिन भोयर, महिला सेना शहराध्यक्ष प्रतिमा ठाकूर, वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष भरत गुप्ता यांनी या संपूर्ण प्रकारात कंपनीची बाजू घेऊन आमच्यावर अन्याय केला असल्याचे त्यांनी म्हटले आहे. पत्रकार परिषद घेऊन याबाबत गुंतवणूकदारांनी आरोप केला आहे. विशेष म्हणजे मनसे अध्यक्ष राज ठाकरे 19 व 20 सप्टेंबर ला जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. यानिमित्ताने कलकामच्या प्रश्नावर राज ठाकरे लक्ष देतात का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. Kal kaam scam
मनसे नगरसेवक सचिन भोयर, महिला सेना शहराध्यक्ष प्रतिमा ठाकूर, वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष भरत गुप्ता यांनी या संपूर्ण प्रकारात कंपनीची बाजू घेऊन आमच्यावर अन्याय केला असल्याचे त्यांनी म्हटले आहे. पत्रकार परिषद घेऊन याबाबत गुंतवणूकदारांनी आरोप केला आहे. विशेष म्हणजे मनसे अध्यक्ष राज ठाकरे 19 व 20 सप्टेंबर ला जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. यानिमित्ताने कलकामच्या प्रश्नावर राज ठाकरे लक्ष देतात का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. Kal kaam scam
विदर्भातील चर्चित कलकाम घोटाळा राज्यात गाजत आहे मात्र या घोटाळ्याचे सूत्रधार अजूनही पसार आहे, एजंट व गुंतवणूकदारांची 100 कोटी रुपयांची फसवणूक झाली, मात्र या प्रकरणात मनसेचे भरत गुप्ता व प्रतिमा ठाकूर यांनी कलकाम कंपनीची बाजू घेत स्वतःचा फायदा घेत, गरिबांना वाऱ्यावर सोडले असा गंभीर आरोप गुंतवणूकदार व एजंटणी पत्रकार परिषदेत केला आहे. Mns adhikrut
भोयर यांनी केले दुर्लक्ष
कमी पैसे गुंतवणूक करा आणि मोठ्या व्याजदराने ते परत मिळवा हे अमिश कलकाम या कंपनीने गुंतवणूकदारांना दिले होते.
चंद्रपूर जिल्ह्यासह विदर्भातील गडचिरोली यवतमाळ व नागपूर या जिल्ह्यातील १०० कोटीपेक्षा जास्त गुंतवणूक या कंपनीत लोकांनी केली. काही दिवस याचा लाभ देखील गुंतवणूकदारांना मिळाला मात्र नंतर पैसे मिळण्यास टाळाटाळ होऊ लागली. यानंतर मनसेच्या महिला सेना शहराध्यक्ष प्रतिमा ठाकूर आणि वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष भरत गुप्ता यांनी आपले पैसे काढून देतो असे आश्वासन दिले. मात्र काही दिवसांतच त्यांनी गुंतवणूकदारांची मदत न करता कंपनीच्या संचालकांची बाजू घ्यायला सुरुवात केली. जे गुंतवणूकदार संचालकांना पैसे परत करण्यासाठी दाद मागायचे त्यांच्यावर दबाव आणून धमकावले जात होते असा त्यांच्यावर आरोप आहे. 2017 पासून कंपनीला संरक्षण देऊन पैसे परत मिळण्यास अडथळा निर्माण करीत असल्याचा आरोप पत्रकार परिषदेत गुंतवणूकदारांनी केला. या सदर्भात आम्ही मुंबई येथील आपले मनसे नेते बाळा नांदगावकर, अविनाश जाधव, संजय जाधव, नंदू घाडी व मनसे महिला राज्य उपाध्यक्षा रिटा गुप्ता यांच्याकडे गेलो असता त्यांनी स्थानिक चंद्रपूर संपर्क अध्यक्ष सचिन भोयर यांच्याकडे हे प्रकरण सोपवलं. मात्र भरत गुप्ता आणि प्रतिमा ठाकूर यांच्यासोबत ते मिळून असल्याने त्यानी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले असा आरोप पत्रकार परिषदेत करण्यात आला.
Investment scam
कुकडे यांनी प्रकरण लावून धरले
यानंतर गुंतवणूकदार यांनी वरोरा भद्रावती विधानसभा जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे यांच्याकडे प्रकरण सोपवलं. त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे या प्रकरणी तक्रार करून कंपनीच्या संचालक व अधिकारी यांच्यावर एम.पी.आय.डी. कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करायला लावून सर्व संचालकाला अटक करायची मागणी लावून धरली त्यानंतर कंपनीच्या एकाला अटक करण्यात आली मात्र मुख्य आरोपीपर्यंत पोलीस पोहचले नाही.
दरम्यान कलकाम च्या गुंतवणूकदारांची बाजू घेतली म्हणून राजू कुकडे यांच्यावर भरत गुप्ता व प्रतिमा ठाकूर मनसे पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत हल्ला करण्यात आला असाही आरोप पत्रकार परिषदेतून करण्यात आला.
असे असेल तर राजसाहेबांची भेट घडवून आणू
यासंदर्भात नगरसेवक सचिन भोयर यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी कुठलाही प्रतिसाद दिला नाही. गुप्ता यांच्या म्हणण्यानुसार केवळ आम्हाला जाणीवपूर्वक लक्ष केलं जातं आहे, आमचे या प्रकरणात काहीही नसताना असा प्रकार वारंवार केला जात आहे. अनेकांना यात अटक झाली काही फरार आहेत. जर राज साहेबांना भेटुन त्यांच्या समस्यांचा तोडगा निघत असेल तर आम्ही त्यांची साहेबांसोबत भेट घडवू असे सांगितले.
Raj thackeray news
चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेले मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे राज्यातील जनतेला न्याय देण्याची भाषा करतात तर ते कलकाम कम्पणीच्या पीडितांना न्याय देणार काय? हा प्रश्न सध्या उपस्थित झाला आहे.
