News34 chandrapur (गुरू गुरनुले)
मुल - भारतातुन नामशेष झालेल्या चीत्ता या प्राण्याची माहीती तरुण पिढीला व विद्यार्थ्यांना व्हावी याहेतूने कर्मवीर महाविद्यालय मूल येथे १४ सप्टेंबर २०२२ रोजी मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. Wild animal
कार्यक्रमाला मार्गदर्शक म्हणून वन्यप्राणी यांचा दांडगा अनुभव असलेले मुल वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी घनश्याम नायगमकर व संजीवन पर्यावरण संस्थेचे अभ्यासू व्यक्तिमत्व सर्पमित्र उमेशसिंह झिरे यांनी चीत्ता बाबत विद्यार्थ्यांना उपयुक्त माहिती समजावून सांगितली. Cheetah
भारतातून नामशेष झालेल्या चीत्ता या प्राण्याचे पुनर्वसन वनविभागा मार्फत मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यान शीवपुर येथे करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. Kuno National Park
विदेशातून आनलेले चार जोडी चीत्ते दिनांक १७/९/२२ ला मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानात सोडण्यात येणार आहेत. असल्याचेही सांगितले. या मार्गदर्शक कार्यक्रमाला कर्मवीर महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. अनिता वाळके, वनपरिक्षेत्र अधिकारी घनश्याम नायगमकर, संजीवन पर्यावरण संस्थेचे अध्यक्ष उमेशसिंह झिरे, मनोज रणदिवे, प्रशांत केदार, प्रभाकर धोटे, अंकुश वाणी,अक्षय दुम्मावार, रुपेश खोब्रागडे, प्रतीक लेनगुरे,हर्षल वाकडे, अनुराग मोहुर्ले, जय मोहूर्ले,यश केदार व कर्मवीर महाविद्यालयाचे असंख्य विद्यार्थी व विद्यार्थीनी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्राध्यापक डॉ. गणेश आगलावे यांनी केले.