News34 chandrapur
भद्रावती - जंगल व्याप्त चंद्रपूर जिल्ह्यात वन्यप्राणी शहराकडे येत आहे तर मानव हा जंगल परिसराकडे वळत आहे.मानव वन्यजीव संघर्षात अनेक नागरिकांनी आपला जीव गमावला आहे.
असाच एक प्रसंग चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती शहरातील खापरी वार्डात घडली. Leopard hunter
शिकार करण्याच्या बेतात जंगलातून पहाटे बिबट्याने चक्क शहरी वसाहतीत प्रवेश केला, परिसरात राहणारे निरंजन रामचंद्र चक्रवर्ती यांच्या घरी असलेल्या पाळीव कोंबड्यावर डल्ला मारण्याचा प्रयत्न करीत असताना बिबट कोंबड्यांच्या खुराड्यात शिरला मात्र तिथेच त्याचा प्रयत्न फसला व त्यामध्ये बिबट अडकला. Human Wildlife Conflict
बिबट कोंबड्यांच्या खुराड्यात अडकल्याची माहिती वाऱ्यासारखी शहरात पसरली असता नागरिकांनी पहाटे चक्रवर्ती यांच्या घराभोवती वेढा घातला.
सदर माहिती वनविभागाला मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठत सकाळी 5 वाजतापासून बिबट्याला जेरबंद करण्याचे प्रयत्नाला 10 वाजता यश आले.
बिबट्याला जेरबंद करीत त्याची वैद्यकीय तपासणी करून भद्रावती वनपरिक्षेत्रात निसर्गमुक्त करण्यात आले.
