News34 chandrapur
चंद्रपूर - शिवसेनेचे बंडखोर नेते रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी ठाकरे कुटुंबियांबद्दल केलेल्या बेताल वक्तव्याच्या निषेधार्थ राज्यातील शिवसैनिक (Shivsena) आक्रमक झाले आहेत.
याच पार्श्वभूमीवर चंद्रपूर जिल्हा शिवसेनेतर्फे 21 सप्टेंबरला गांधी चौकात जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे यांच्या नेतृत्वाखाली जोडे मारो आंदोलन करण्यात आले. Shivsena protest
या आंदोलनात रामदास कदम यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
चंद्रपूर जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे यांनी रामदास कदम यांना महाराष्ट्र राज्यात फिरू देणार नाही असा इशारा दिला, कदम यांना जी ओळख मिळाली ती शिवसेनेतर्फे मिळाली, ज्यांनी कदमांना मंत्री बनविले तो आज ठाकरे कुटुंबियांची बदनामी करीत आहे, अश्या गद्दारांना जनता कधी माफ करणार नाही.
Shivsena news
रामदास कदम काय म्हणाले होते?
शिवसेनेचे बंडखोर नेते रामदास कदम यांनी दापोली येथील सभेत केलेल्या वक्तव्यावरुन शिवसेना नेते संतप्त आहेत. मी बाळासाहेब ठाकरेंचा मुलगा आहे, हे किती वेळा सांगाल? तुम्हाला शंका आहे का, अशा शब्दात रामदास कदमांनी टीका केली. यावरुन मुंबईसह कोकणातील शिवसेना नेत्यांच्या आक्रमक प्रतिक्रिया येत आहेत. तसेच उद्धव ठाकरे कुठेही गेले तरी रश्मी वहिनी त्यांच्यासोबत असायच्या. माँसाहेब मीनाताई ठाकरे या आयुष्यात कधीही व्यासपीठावर चढल्या नाहीत, अशी टीका रामदास कदम यांनी केली होती. Chandrapur shivsena

या आंदोलनात शिवसेना मुलं तालुका प्रमुख प्रशांत गट्टूवार, गोंडपिपरी तालुकाप्रमुख सूरज माडूरवार, बल्लारपूर ता.प्र. प्रकाश पाठक, चंद्रपूर ता.प्र.संतोष नुरुरे, चंद्रपूर शहर प्रमुख सुरेश पचारे,घुग्घूस शहर प्रमुख बंटी घोरपडे, बल्लारपूर शहर प्रमुख बाबा शाहू , महिला आघाडी चे कल्पना ताई गारगोटे, वर्षाताई कोटेकार, युवती सेना रोहिनी ताई पाटील, युवासेना जिल्हा समनव्यक विक्रांत सहारे,स्वप्निल काशिकर, राहुल विरुटकर, विनय धोबे, प्रणित अहिरकर, हेमराज बावणे, हर्षल कामपट्टिवार, अंकुश वांढरे, योगेश भांदक्कर, ज्ञानेश्वर लोनगाडगे, सुष्मित गौरकार, रिजवान शेख, विकास विरुटकर व समस्त शिवसेना ,युवा सेना, महिला आघाडी, युवति सेना, पदाधिकारी व शिवसैनिक, युवासैनीक उपस्थित होते.