चंद्रपूर - राज्यातील मनपा निवडणूक संदर्भात महत्वाची माहिती पुढे आली असून प्रभाग रचनेत बदल होणार नसून वर्ष 2017 च्या रचनेनुसार प्रभाग रचना असणार आहेत. Chandrapur municipal corporation election
या बैठकीत महापालिका निवडणुकीत (Election 2022) नवी वॉर्डर रचना तयार करण्यात आली होती. ती वॉर्ड रचना रद्द केल्याची माहिती विश्वासनीय सूत्रांनी दिली आहे. तसेच 2017 मध्ये ज्या वॉर्डरचनेप्रमाणे निवडणुका झाल्या होत्या. त्याच वॉर्ड रचनेप्रमाणे यंदाही निवडणूक घेण्याचा सरकारचा विचार असल्याचे समजते. या निर्णयाची प्रत्यक्षात अंमलबजावणी झाल्यास हा महाविकास आघाडीसाठी आणखी एक मोठा धक्का ठरु शकतो.
