News 34 chandrapur
चंद्रपूर - 2 ऑगस्ट रोजी वाढदिवसानिमित्त वंचित बहुजन आघाडीचे चंद्रपूर (प) जिल्हाध्यक्ष श्री. भूषण मधुकरराव फुसे यांनी प्रायोजित करून निशुल्क वैद्यकीय आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करीत गरजू रुग्णांना निशुल्क औषधांचे वाटप केले.
श्री. फुसे यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक ग्रामीण व आदिवासी भागांचा दौरा करून वैद्यकीय सुविधा आणि डॉक्टरांची गंभीर कमतरता पाहिली आहे. गेल्या महिन्यात आलेल्या पुरामुळे शेतकरी आणि ग्रामस्थांच्या आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. ही बाब लक्षात घेऊन त्यांनी पूरग्रस्त ग्रामीण भागातील गरजू रुग्णांना मदत करण्याचा निर्णय घेतला. श्री. फुसे यांनी मानव कल्याण ही त्यांची प्राथमिक जबाबदारी म्हणून स्वीकारली आहे आणि त्यानुसार अनेक समाजकल्याणाचे प्रकल्प राबवले आहेत. गेल्या वर्षी त्यांनी आपल्या श्रम आणि स्वनिधीतून बाबुपेठ आणि तुकूम भागातील खड्डे बुजवले. त्यांनी सर्व राजकीय प्रतिनिधी आणि सक्षम नागरिकांनी पुढे येऊन पूरग्रस्त नागरिकांना मदत करण्याचे आव्हान केले आहे.
या शिबिरला डॉ प्रदीप मंडल सर MD (Medicine) आणि डॉ. ताझिन सय्यद मॅडम यांनी तपासणी केली. या शिबिरला मुख्य सहकार्य वंचित बहुजन आघाडी गोंडपिपरी तालुकाप्रमुख डॉ. प्रकाश तोहोगावकर यांनी केले.
सदर कार्यक्रमासाठी वंचित बहुजन आघाडीचे गोंडपिपरी तालुका उपाध्यक्ष लक्ष्मण रामटेके, महासचिव सुरेंद्र रायपुरे, प्रसिद्धी प्रमुख भारत चंद्रागडे, युवा नेते नितेश जुनघरे, जिल्हा उपाध्यक्ष तेजराव डोंगरे, शाखाप्रमुख दिलीप मुंजनकर, धाबा सर्कल सचिव सुरज मुत्येमवार, शाहिराज अलोणे माजी उप सरपंच, भारतीय बौद्ध महासभा शाखा चेकबापूरचे अध्यक्ष राहुल मुंजनकर, सचिव सुमेध मुंजनकर, बबन रामटेके माजी उपसरपंच, भारत गोंगले व सर्व वंचित बहुजन आघाडीचे सक्षम कार्यकर्ते उपस्थित होते.
