News 34 chandrapur रमेश निषाद
विसापूर : बल्लारपूर वेकोलि क्षेत्रातील सास्ती खुल्या कोळसा खाणीत कार्यरत कर्मचारी रेल्वे मार्गाने पूर पाहण्यासाठी पुलाकडे गेला.घराकडे परत येताना वीज पोल क्रमांक ८८६/२० ते ८८६/२२ दरम्यान दिल्ली - चेन्नई दरम्यान धावणाऱ्या रेल्वे ने मागून जबरदस्त धडक दिली. या धडकेत त्याचा जागीच मृत्यू झाला.
ही घटना शुक्रवारी दुपारी ४.३० वाजता बल्लारपूर तालुक्यातील विसापूर जुन्या रेल्वे फाटकाजवळ चंद्रपूर - बल्लारपूर रेल्वे मार्गादरम्यान घडली. रविंद्र बापूराव उलमाले ( वय -४८ ) रा. विसापूर ता. बल्लारपूर असे रेल्वे अपघातात मृत्यू झालेल्या वेकोलि कर्मचाऱ्याचे नाव आहे.
रवींद्र उलमाले हा बल्लारपूर वेकोलि क्षेत्रातील सास्ती खुल्या कोळसा खाणीत सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत होता. वर्धा नदीला पूर आल्यामुळे मागील तीन दिवसापासून घरीच होता. आज दुपारी तो विसापूर गावात पूर आल्यामुळे रेल्वे मार्गाने पूर पाहण्यासाठी रेल्वे पुलाकडे गेला. पूर पाहून तो घराकडे परत येत होता. आपल्या विचार चक्रात येत असताना जुन्या रेल्वे फाटकाजवळ मागून रेल्वे येत असल्याबाबत काहींनी त्याला आवाज दिला. मात्र तो पर्यंत चंद्रपूर कडून बल्लारपूर कडे जाणारी सुपरफास्ट रेल्वे धडधड करत आली. रेल्वेच्या जबरदस्त धडकेत त्याचा जागीच मृत्यू झाला. त्याच्या पश्च्यात पत्नी, मुलगा, मुलगी, आई, वडील असा परिवार आहे.
या घटनेची माहिती होताच विसापूर औट पोस्ट पोलीस चौकीचे पोलीस कर्मचारी गजानन साखरकर व दुष्यंत गोडबोले यांनी घटना स्थळी धाव घेऊन घटनेचा पंचनामा केला. घटनेचा अधिक तपास विसापूर पोलीस करत आहे.
बहिणीच्या हाताने राखी बांधण्याचे नशिबात नव्हते
विसापूर येथील बापूराव उलमाले यांना दोन मुले व दोन मुली आहेत. त्या दोन्ही मुली आज रक्षाबंधना निमित्त ओवाळणी करून राखी बांधण्यासाठी विसापूर येथे आल्या. भावाला राखी बांधून दीर्घायुष्याची कामना बहिणीने केली. रवींद्र याने संध्याकाळी राखी बांधण्याचे बहिणीला सांगितले. मात्र त्याचा अपघाती मृत्यूने बहिणीची राखी देखील बांधण्याचे रवींद्रच्या नशिबात नव्हते, असी भावना गावाकऱ्यांनी व्यक्त केली. त्याचा अकाली मृत्यूने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.