News 34 chandrapur (गुरू गुरनुले)
मुल - स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्ताने तहसील कार्यालय, मुल व उपविभागीय अधिकारी कार्यालय मुल यांच्या संयुक्त विद्यमाने हर घर झेंडा अभियान राबविण्यासाठी १२ ऑगस्ट रोजी फोरव्हिलर, टूव्हिलर तिरंगा ध्वज रॅलीचे आयोजन करण्यात आले. Tiranga Rally
मुल येथील तहसील कार्यालय येथून गांधी चौक ते नगरपरिषद ,नागपूर रोड,विश्रामगृह रोड,चंद्रपूर रोड येथे तहसीलदार डॉ.रविंन्द्र होळी यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून रैलीला रवाना करण्यात आले. यावेळी उपनिरीक्षक पोलिस अधिकारी, कर्मचारी, महिला कर्मचारी, उपस्थित होते. सदर रॅली ही तहसील कार्यालय येथून गांधी चौक ते नगरपरिषद ,नागपूर रोड,विश्रामगृह रोड,चंद्रपूर रोड या मार्गावरुन गेल्यानंतर तहसिल कार्यालय मुल येथे रॅलीची सांगता करण्यात आली. Har Ghar Tiranga
रॅलीच्या माध्यमातून नागरिकांना घरोघरी झेंडा लावण्याबाबत जनजागृती करण्यात आली.या रैलीमध्ये नायब तहसिलदार पृथ्वीराज साधनकर साहेब, नायब तहसीलदार पवार साहेब, कुंभारे साहेब,ठाकरे साहेब,उपनिरीक्षक पोलीस अधिकारी, पोलीस कर्मचारी,महसूल विभागातील तलाठीमंडळ अधिकारी, विविध विभागातील महिला कर्मचारी,रेशन विभागातील कर्मचारी, रेशनविक्रेता, सेतूकेंद्रातील कर्मचारी,आधार केंन्द्रातील कर्मचारी,, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, नागरिक हातात तिरंगा घेवून मोठ्यासंख्येने उपस्थित होते. तिरंगा जनजागृती रॅली काढल्याने मुल नगरात चैतन्याचे व उत्साहाचे वातावरण मुल नगरात निर्माण झाले आहे.