News 34 chandrapur
राजुरा - बल्लारपूर ते काझीपेठ मध्यरेल्वेच्या मार्गावर 9 ऑगस्ट ला रात्री च्या सुमारास वाघ रस्त्याच्या पलीकडे जात असताना रेल्वेने वाघाला जोरदार धडक दिली. Tiger dies in train collisionया धडकेत वाघाचे 2 तुकडे झाले, 10 ऑगस्टला सकाळच्या सुमारास गँगमन रेल्वे रुळाची तपासणी करिता जात असताना सदर बाब उघडकीस आली.
वनविभागाला घटनेची माहिती प्राप्त होताच तात्काळ उपविभागीय वन अधिकारी अमोल गर्कल, वनपरिक्षेत्र अधिकारी सुरेश येलकेवाड, क्षेत्र सहायक नरेंद्र देशकर,आणि वनरक्षक संजय जाधव,वनमजुर,सह मोक्यावर जाऊन पंचनामा केला आणि वरिष्ठ वन अधिकारी यांना याची माहिती देऊन पुढील कार्यवाही सुरू केली. Tadoba tiger