News 34 chandrapur गुरू गुरनुले
मुल - देशाच्या स्वातंत्र्यासाठी काँग्रेसच्या थोर महात्म्यानी व नेत्यांनी बलिदान दिले आहे. त्यांच्या बलिदाचे स्मरण करुन अमृत महोत्सानिमित्त इंग्रजांना साथ देणाऱ्या आणि प्रत्येक वस्तूवर जीएसटी gst लाऊन महागाई वाढऊन जनतेला गरिबीच्या खाईत लोटत आहे. inflation अशा देश विकणाऱ्या भाजपाला सतेच्या बाहेर हाकलून लावा.
कारण ३०० चा गॅस ११०० केला. खाण्याचा तेल ७० चा १७० केला खताचे भाव वाढवले. कुठल्याही वस्तूची वाढ ५० रुपयांनी करते, व ६ रुपये कमी करते ही लूट भाजपवाले करीत असून अशांना हाकलून देशाचे स्वातंत्र्य व संविधान अबाधित ठेवा. असे विचार काँग्रेस नेते, राज्याचे माजी बहुजन कल्याण मंत्री आमदार विजय वडेट्टीवार यांनी मुलच्या जनतेला केले. क्रांती दिनानिमित्त गोंडपीपरी तालुक्यातून निघालेल्या अमृत महोत्सव गौरव पदयात्रा प्रसंगी मार्गदर्शन करतांना बोलत होते. Congress Amrit Mahotsav Gaurav Padayatra
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष तथा माजी जी. प.अध्यक्ष संतोषसिंह रावत यांनीही आपले विचार व्यक्त करतांना देश वाचविण्यासाठी काँग्रेसच्या नेत्यांनीच बलिदान देऊन लोकशाही जिवंत ठेवली. पण मोदी सरकार खाजगीकरणाच्या नावावर गरिबांच्या अन्नावर, दुधावर, शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या खतावर, गॅस इंधन, सिलेंडरवर,पेट्रोल डिझेलवर, भरमसाठ भाव वाढ करून शेतकऱ्यांची गोरगरीब जनतेची लूट करीत आहे. रोजगार नाही. गरिबांच्या मुलांना काम नाही. शेतकऱ्यांना कुठलीही नुकसान भरपाई नाही. मुल स्मार्ट सिटी म्हणून गाजावाजा करीत आहेत परंतु वॉर्ड नंबर ८ सुशिक्षित कॉलनीतील घरात पाणी घुसले, ढीवर मोहल्यात पाणी घुसले, झोपडपट्टी पूर्ण पाण्यात राहिली. अनेक कुटुंबाचे नुकसान झाले. काही वॉर्डातील रस्ते अरुंद, नाल्या नाही दुचाकी वाहन जात नाही.रस्ते व नाल्याचे काम नियोजन शून्य आहे. तरी म्हणतात स्मार्ट सिटीच्या नावाखाली भाजपने मुल नगराचे प्रसंगी देशाचे वाटोळे केले आहे. अशा हुकुमशाही भाजपा राजवटीला दूर ठेवावे असे आव्हान संतोषसिंह रावत यांनी केले. याप्रसंगी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रकाश देवतळे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
पोंभुर्णा, देवाडा, सिंतला, भेजगाव, मार्ग मुल येथे आलेल्या पद यात्रेचे आगमन होताच डॉ.बाबासाहेब आंबेडकर, भगवान गौतम बुद्ध व महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्प हार अर्पण करुन गांधी चौक मुल येथे अमृत महोत्सव यात्रेचे स्वागत तालुका काँग्रेस कमिटी तर्फे करण्यात आले. सभा मंचावर चंद्रपूर जिल्हा महिला काँग्रेस अध्यक्षा नम्रता ठेमस्कर, श्याम थेरे,जिल्हा मध्यवरती बँकेचे माजी अध्यक्ष देवराव सावकार चिमड्यालवार, नत्थुपाटील आरेकर, करीम भाई, तालुका काँग्रेस अध्यक्ष घनश्याम येनुरकर, संजय गांधी निराधार योजना समिती माजी अध्यक्ष राकेश रत्नावार, महिला काँग्रेस अध्यक्षा रुपाली संतोषवार,माजी सभापती वैशाली पुलावार, यांचेसह शहर व ग्रामीण काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते. आयोजित सभेस हजारो संख्येत कांग्रेस कार्यकर्त्यांची उपस्थिती लक्षणीय होती. संचालन शहर काँग्रेस अध्यक्ष सुनील शेतकी यांनी केले प्रास्तविक ओबीसी सेलचे राज्य सरचिटणीस गुरुदास चौधरी यांनी केले आभार गंगाधर कुनघाडकर यांनी मानले. याप्रसंगी ज्येष्ठ काँग्रेस कार्यकर्ते बंडू गुरनुले,चंदू चतारे, राजू पा. मारकवार, संदीप कारमवार, दीपक वाढई, डॉ. लेंनगुरे, पुरुषोत्तम भुर्से, किशोर घडसे,हसन वाढई,दशरथ वाकुडकर, विनोद कामडे, ललिता फुलझेले, विष्णू ससा सादमवार, संदीप मोहबे,कैलास चलाख, गणेश खोब्रागडे, अतुल गोवर्धन, अनवर शेख,सुरेश फुलझेले, यांचेसह तालुका,शहर,युवक,महिला काँग्रेस व सर्व सेलचे पदाधिकारी,ग्रामीण काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्ते हजारोच्या संख्येने उपस्थित होते.